Type Here to Get Search Results !

जिया खान हिचा पहिला रोजा पूर्ण

 




महागाव : प्रतिनिधी विवेक नरवाडे

महागाव पवित्र रमजान महिन्याची सुरुवात मोठ्या भक्तीभावात झाली असून महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील पत्रकार शेरखान पठाण यांची आठ वर्षीय कन्या जिया खान हिने आपला पहिला रोजा पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. लहान वयातच तिने दाखविलेल्या श्रद्धा व चिकाटीचे परिसरात कौतुक होत आहे.

मुस्लिम समाजासाठी रमजान महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात पहाटेच्या सहरीपासून सूर्यास्तापर्यंत उपवास ठेवला जातो. दिवसभर संयम, सबुरी आणि आत्मशुद्धीचा संदेश आचरणात आणला जातो. नमाज पठण, कुराण शरीफचे वाचन, दानधर्म आणि गरजूंची मदत यांना विशेष महत्त्व दिले जाते.जिया खान हिनेही कुटुंबीयांच्या मार्गदर्शनाखाली आपला पहिला रोजा ठेवला. पहाटे सहरी करून तिने दिवसभर उपवास पाळला. दिवसभरातील वेळेत तिने नमाज अदा केली तसेच कुराण वाचनात सहभाग घेतला. सूर्यास्तानंतर इफ्तार करून तिचा पहिला रोजा पूर्ण झाला.

लहान वयात उपवास पाळणे हे जिद्द आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. जियाने उत्साहाने व आनंदाने रोजा पूर्ण केल्याने कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तिच्या या कृतीबद्दल नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी तिचे अभिनंदन केले.रमजान महिन्याच्या निमित्ताने समाजात बंधुभाव, दानशूरता आणि सहकार्याची भावना अधिक दृढ होते. जियाच्या या प्रयत्नामुळे इतर लहान मुलांनाही धार्मिक संस्कारांची प्रेरणा मिळत आहे.फुलसावंगी परिसरात जिया खान हिच्या पहिल्या रोजाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


Post a Comment

0 Comments