Type Here to Get Search Results !

लव्ह जिहाद’ व सक्तीच्या धर्मांतरविरोधी कठोर कायद्याच्या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय निफाड येथे निवेदन

 



  प्रतिनिधी :- गणेश ठाकरे लासलगाव 

राज्यात ‘लव्ह जिहाद’ तसेच बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांबाबत कठोर कायदा करावा, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आज शुक्रवार दि.१३ फेब्रुवारी २०२६ रोजी निफाड येथील उपविभागीय कार्यालयात निवेदन देण्यात आले.

    दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाने ‘लव्ह जिहाद’ व सक्तीच्या धर्मांतराच्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली होती. मात्र, या निर्णयाला जवळपास एक वर्ष पूर्ण होत असतानाही अद्याप कोणताही ठोस कायदा अस्तित्वात आलेला नाही. शासनाच्या या दिरंगाईमुळे हिंदू समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. राज्यात अशा प्रकारच्या घटनांनी गंभीर स्वरूप धारण केले असून समाजात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांवर तातडीने आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कठोर कायदा करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या मागणीसाठी सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

     या निवेदनावर समाधान कापसे, कौस्तुभ पगार, ज्ञानेश्वर शिरसाट, चिराग जोशी, विकी काळे, हरिओम परदेशी, नवनाथ धारराव, संगीता गुंजाळ, प्रमिला लोणारी, विवेक शर्मा आदी सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments