धुळे साक्री कुणाल शिंदे
कबुतर देवाण घेवाण खून प्रकरणी आरोपीच्या विरुद्ध कामकाज सुरू होते त्या दिवशी आलेल्या दोंडाईचा येथील नबू पिंजारी यांना काही तरुणानि मारहाण केली होती त्या मारहाण प्रकरणी ज्या तरुणांचा हल्यात काहीही संबंध नाही त्याचीही नावे नबू पिंजारी यांनी दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी वातावरण तापले होते साक्री शहरातील चाँद तारा मोहल्ला येथून मोर्चाला सुरुवात झाली सोनार गल्ली बाजारपेठ लक्ष्मी रोड बस स्टॅण्ड रोड ते पोलीस स्टेशन येते धडकला सकाळी 11 वाजता मोर्चाची सुरुवात झाली मोर्चा पोलिस स्टेशनला आल्या नंतर मोर्चेकऱ्यांनी लगेच ठिय्या आंदोलन सुरू केले
बेकसुर तरुणावर झालेले खोटे गुन्हे मागे घ्या ही प्रमुख मागणी होती दिनांक 12 रोजी नबू पिंजारी व त्याचे साथीदारांनी साक्री येथील अनेक तरुणावर खोटे गुन्हे दाखल करून तरुणांना अडकवण्याचा प्रयत्न केला आहे मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे व्हिडीओ मध्ये मारहाण करणाऱ्या तरुणांनावर कायदेशीर कारवाई व्हावी परंतु ज्यांचा संबंध नाही त्यांना आरोपातून मुक्त करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली या वेळी पी आय अनिल बागुल प्रसाद रौंदळ किरण बर्गे यांनी तपासकरून जे या प्रकरणात सहभागी नसतील त्यांची नावे कायदेशीर वगळण्यात येतील असे मोर्चेकरांना आश्वासन दिले

Post a Comment
0 Comments