प्रतिनिधी - गोपाळकुमार कळसकर भुसावळ
भुसावळ : सन २०२६ ते २७ या वर्षातील विविध समाजसेवी उपक्रम राबविण्याच्या हेतूने मराठा समाज उन्नती मंडळाची सर्वसाधारण सभा नुकतीच आयुध निर्माणी वरणगाव येथे संपन्न झाली. यावेळी शिवजयंती महोत्सव कमिटी २०२६ ची निवड करण्यात आली. त्यामध्ये डी .एम.पाटील (धनराज पाटील) सचिव ,प्रवीण शिंदे कार्याध्यक्ष आणि सागर पाटील यांची खजिनदार पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी डी. एम.पाटील यांनी सांगितले की या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती कमिटीच्या वतीने श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित वकृत्व स्पर्धा ( भाषण) , चित्रकला स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा तसेच किल्ले बनवणे स्पर्धा , इंग्लिश स्पेलिंग स्पर्धा, आजच्या स्पर्धात्मक युगात "सामान्य ज्ञान परीक्षा"चे आयोजन करण्यात येणार आहे. शिव व्याख्याते व्याख्याते नरेश पाटील (मुंबई )यांचे "शिवरांयाच्या विचारांचे झाले काय ?" या विषयावर चिंतनात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या आयुध निर्माणी वरणगाव परिसरातील नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. परिसरातील नागरिकांसाठी " रक्तदान व आरोग्य शिबिराचे " आयोजन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. देशाची वाढती रक्ताची गरज पाहता रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रम सप्ताहात १७ फेब्रुवारी ला महाप्रसाद व १९ फेब्रुवारी ला सकाळी छ.शिवाजी महाराज शासकीय पूजा व संध्याकाळी भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन केले आहे. कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे चित्रकला स्पर्धा,किल्ले बनविणे व इतर स्पर्धा वेळेत पार पडणार आहेत. जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन हा कार्यक्रम सर्वांनी यशस्वी करावा असे आवाहन आयोजन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमास मराठा समाज उन्नती मंडळ, आयुध निर्माणी वरणगाव व ग्रामपंचायत सरपंच ,सदस्य दर्यापूर यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

Post a Comment
0 Comments