. मंगळवारी ३ तारखेला संध्याकाळी ५वाजता मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर आडोशी बोगद्या जवळ मुंबई कडे जाणाऱ्या मार्गावर कॅमीकल ने भरलेला टॅंकर बोगद्या अगोदर तीव्र उतार वर एक वळणावर उलटला व गॅसची गळती झाली व वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात दोन्हि बाजुने झाली.वाहन चालक,प्रवाशी ज्या मधे महिला,लहान मुले, वृद्ध,अपंग, आजारी व्यक्ती अश्या सर्वच प्रवाशांना वाहतूक कोंडी मधे ३४ तास अडकुन पडले व प्रचंड हाल व मनस्ताप सहन करावा लागला.
पिंपरी चिंचवड ते नवीमुंबई पर्यंत असणाऱ्या एखाद्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी ने का नाही येऊन कार्यकर्त्यां सोबत अडकलेल्या प्रवाश्यासाठी मदत कार्य केले....??मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, व मंत्र्याच्या प्रवासासाठी शासन खर्च करते व सामान्य लोकांना का रस्त्यावर अन्न पाण्याविना का सोडण्यात आले. तेव्हा का नाही वापरले हेलिकॉप्टर किव्वा अन्य जलद पर्याय...??
सगळे राजकारणी जिल्हा परिषद प्रचारात व्यस्त. कोणाला वेळ आहे सामान्य लोकसाठी...जर एखादा राजकीय मेळावा असता किव्वा पंतप्रधान दौरा असता तर राजकीय पक्षानी व शासनाने लाखो लोकांच्या खाण्या पिण्याची सोय केली असती मग या, 32 तासात कुठे गेली माणुसकी...??मावळ भागात पोलिसांनी अन्न धान्य साहित्यवाटप केले, 18 तासा नंतर खालापूर तहसील कार्यालया मार्फत प्रवाशांना पाणी व अन्न वाटप केले, (अनेकांना सोय झाली) पण ते सर्वानाच दिलासा देईल असे पुरेसे न्हवते....
ADG ट्रॅफिक प्रवीण साळुंखे, पोलीस प्रशासनाचे आय जी संजय दराडे साहेब, रायगड पोलीस SP आचल दलाल, महामार्ग सुरक्षा पथक SP तानाजी चिखले साहेब, खालापूर dysp डॉ नेहूल व टीम, प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण, पनवेल व RTO निरीक्षक दिलीप दराडे व टीम. ट्रॅफिक dysp दिघे मॅडम, खालापूर तहसीलदार अभय चव्हाण महसूल टीम, खाजगी कंपन्या चे फायर टेंडर, केमिकल एक्स्पर्ट, IRB यंत्रणा सोबत हेल्प फॉउंडेशन ई. रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत स्पॉट वरती सर्व वरिष्ठ अधिकारी ठाण मांडून होते तर त्यांच्या टीम आपत्कालीन मदत कार्यात गळती रोखण्यासाठी व वाहतूक नियोजना मध्ये व्यस्त होते.
सर्वच मेन स्ट्रीम मीडिया, पत्रकारांनी प्रवश्यांचे हाल दाखवले तरीही रायगड जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन, पूणे जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनाने, संबंधित क्षेत्रातील लोकप्रतिनिधी नी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून अडकलेल्या प्रवश्यासाठी फूड पॅकेट, पाणी ई. ची व्यवस्था करायला पाहिजे होती, प्रवाश्यांचे मात्र उपाशी पोटी खूप हाल झाले.

Post a Comment
0 Comments