प्रविण कुंटे उमरखेड प्रतिनिधी
‘उडान २०२६’ लॉ फेस्टचे यशस्वी आयोजनकायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्यविकास, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करणारा भव्य असा ‘लॉ फेस्ट – उडान २०२६’ हा चार दिवसीय महोत्सव स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ, यवतमाळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तसेच नव्या संधींचे दालन उघडण्यासाठी हा फेस्ट महत्त्वपूर्ण ठरत आहे. ‘उडान’ हे नावच विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांच्या उंच भरारीसाठी प्रेरित करणारे आहे.हा फेस्ट भव्य व व्यापक स्वरूपाचा असून त्यामध्ये विविध कायदा महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. फेस्टमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, चर्चासत्रे, लीगल क्विझ, पेपर प्रेझेंटेशन, नृत्य, संगीत, नाट्यकृती तसेच विविध मनोरंजनात्मक स्पर्धांचा समावेश आहे.चार दिवसीय फेस्टिव्हलचा उद्घाटन सोहळा दिनांक ५ फेब्रुवारी रोजी अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री. शेखर मुनघाटे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, यवतमाळ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सी. ए. प्रकाश चोपडा, सचिव, विद्या प्रसारक मंडळ होते. तसेच सन्माननीय अतिथी म्हणून ॲड. प्रवीण जानी, ॲड. महेंद्र ओसवाल व ॲड. आर. के. मनक्षे यांनी उपस्थिती दर्शविली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजेश मुनोत आणि कार्यक्रम समन्वयक डॉ. वैशाली फाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. योगिता बोरा यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ हे गुणवत्तापूर्ण कायदे शिक्षण आणि विद्यार्थी विकासासाठी प्रसिद्ध असून, ‘उडान लॉ फेस्ट २०२६’ हा त्या परंपरेचा पुढचा टप्पा ठरत आहे. हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या ऊर्जा, कल्पकता आणि आत्मविश्वासाला नवे पंख देणारा ठरणार आहे.या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. संदीप नगराळे, डॉ. स्वप्नील सगणे, प्रा. पल्लवी हांडे, प्रा. वंदना पसारी, प्रा. नलिनी आदमने, प्रा. निवेदिता कोकाटे, प्रा. शंतनू कनाके, प्रा. रंजित अगमे तसेच संपूर्ण कॉलेज प्रशासन, विद्यार्थी आणि शिक्षकेत्तर कर्मचारीवर्गाने विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments