Type Here to Get Search Results !

लेखणीच्या माध्यमांतून समाज जागृतीचे महान कार्य करा - तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर

 



गजानन वाघमारे डोणगांव प्रतिनिधी :-


 सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या स्थानिक संजीवनी सेवाभावी परिवाराच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पत्रकार अशोकराव वानखेडे यांना संजीवनी दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी पत्रकार बांधवांना मार्गदर्शन करीत लेखणीच्या माध्यमांतून समाज जागृतीचे महान कार्य करा असे मत रिसोड जि वाशिम तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर यांनी व्यक्त केले. दि 1 फेब्रुवारी रोजी राजुरकर मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोदबाप्पु देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर, सहा. पोलीस निरीक्षक संतोष आघाव, भारत मोरे, अनिल आवटी, अकबरखा पठाण, डॉ गजानन उल्हामाले, राजेंद्र पळसकर , दिपक पाटील आखाडे, बबनराव पळसकर,डॉ नकुल फुले,आदि मान्यवर मंडळी उपस्थित होती, स्व डॉ जगदीश बिडवई यांच्या स्मृति प्रित्यर्थ दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा ग्रामीण पत्रकार बांधवांना प्रेरणा मिळावी हा मुख्य उद्देश ठेवून पत्रकार बांधवांना संजीवनी दर्पण पुरस्काराने गौरविण्यात येते. या वर्षी पत्रकार अशोकराव वानखेडे,नवल राठोड,सादिक कुरेशी, गजानन देशमुख, रविद्र वाघ यांना पुरस्काराने सन्मानित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हमीद मुल्लाजी तर आभार प्रदर्शन सुरेन्द्र सिंह चव्हाण यांनी केले. पुरस्कार प्राप्त सर्व पत्रकार बांधवाचे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद बाप्पु देशमुख, तालुका ध्यक्ष गजानन चनेवार, सिध्देश्वर पवार,कैलास राऊत, डोणगांव पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन गाभणे,राजेश वाघमारे,सुरेश आप्पा फिसके,रफीक कुरेशी,दत्ता उमाळे, विष्णू आखरे, , अबरार खान मिल्ली, गजानन नरवाडे आदिनी अभिनंदन केले.


Post a Comment

0 Comments