Type Here to Get Search Results !

पत्रकार बोरुडे संतोष किसन यांचा विश्वकर्मा जयंतीनिमित्त समाजातर्फे गौरव



पिंपळगाव कौडा (ता. नगर, जि. अहिल्यानगर) 

येथील पत्रकार बोरुडे संतोष किसन यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय व आदर्श कार्याबद्दल “आदर्श पत्रकारिता भूषण पुरस्कार” प्रदान करण्यात आला. या सन्मानाबद्दल श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंतीच्या पावनदिनी समाजातर्फे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी समाजाच्या वतीने बोरुडे यांचे पत्रकारितेतील सामाजिक बांधिलकी, वस्तुनिष्ठ लेखन व ग्रामीण-शहरी प्रश्नांना न्याय देणाऱ्या कार्याची प्रशंसा करण्यात आली. समाजहिताच्या विषयांना प्राधान्य देत सातत्याने जनजागृती करणाऱ्या त्यांच्या कार्यामुळेच हा पुरस्कार प्राप्त झाल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

सत्कार समारंभास ट्रस्टचे पदाधिकारी, समाजबांधव, मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी बोरुडे संतोष किसन यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पुढील काळातही प्रामाणिक व निर्भीड पत्रकारिता करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला 

Post a Comment

0 Comments