*भोर प्रतिनिधी नरेंद्र यादव*
यशवंत मंगल कार्यालय, भोर येथे महाराष्ट्राचे लाडके, कणखर आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाबद्दल समस्त भोरकर नागरिकांच्या वतीने भावपूर्ण शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
दादांच्या जाण्याने केवळ एक नेता नाही, तर सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा आधारवड हरपल्याची भावना प्रत्येकाच्या मनात होती. शब्दाला जागणारे, कामात प्रामाणिक आणि निर्णयात ठाम असलेले दादा अनेकांसाठी प्रेरणास्थान होते. त्यांची साधी राहणी, स्पष्ट बोलणं आणि लोकांप्रती असलेली आपुलकी यामुळे ते जनमानसात घर करून राहिले.
शोकसभेत उपस्थित नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये दादांबद्दलचा आदर, प्रेम आणि कृतज्ञता दडलेली होती. त्यांच्या कार्याची, लोकहितासाठी घेतलेल्या निर्णयांची आणि विकासासाठी केलेल्या धडपडीची आठवण काढत सर्वांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
दादा आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, त्यांची कार्यपद्धती आणि जनतेसाठी झटण्याची प्रेरणा कायम आपल्या सोबत राहील. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

Post a Comment
0 Comments