गजानन वाघमारे डोणगाव प्रतिनिधी :-
डोणगाव. इयत्ता बारावीच्या सामूहिक कॉपी प्रकरणावर कार्यवाही करणाऱ्या भरारी पथकाचे शासकीय स्तरावर मानसन्मान करावा अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोधभाऊ सावजी यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कडे दि. १९ फेब्रुवारी ला पत्राद्वारे केली आहे. त्यांनी आपल्या पत्रात इयत्ता बारावी परीक्षेत ५८१ विद्यार्थ्यांवर वाशिम जिल्ह्यामध्ये श्री मैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय टो-जुमडा जि. वाशिम फाटा या परीक्षा केंद्रावर १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता भरारी पथकाने भेट दिली असता ५८१ विद्यार्थी सामूहिक कॉपी करताना पकडले व या कॉपी प्रकरणात सहकार्य करणारे २६ कर्मचारी निलंबित करण्यात आले. शिक्षण क्षेत्रामध्ये न भूतो न भविष्यती आपले राज्यात चालत असलेला भ्रष्टाचार यावर नसणारे नियंत्रण अशा परिस्थितीत ज्या भरारी पथकाने अशा मोठ्या भ्रष्टाचारास आळा घालण्याचा प्रयत्न केला या कारणाने या पथकाचा मान सन्मान शासन स्तरावर होणे आवश्यक आहे.तरी माझी मागणी आपण मान्य करावी असे नमूद केले आहे.

Post a Comment
0 Comments