गजानन वाघमारे डोणगाव प्रतिनिधी :-
डोणगाव. मॉ. जिजाऊ, संत गजानन महाराज, ताराराणी, जगप्रसिद्ध लोणार सरोवर, सर्वात मोठी मूर्ती असलेले भगवान शारंगधर, दादा सैलानी, आणि अशा अनेक गोष्टींनी मान उंच असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रपती द्रोपदीजी मुर्मू हया आयुष मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात. . येत आहेत. सदर जिल्हा दौऱ्यात राष्ट्रपती नी जिल्ह्यात असलेल्या विविध समस्याचा आढावा घ्यावा अशी मागणी शैलेश सावजी यांनी राष्ट्रपती यांना दिलेल्या पत्रात केली आहे. त्यांनी आपल्या पत्रात जिल्ह्याला आपले पासून फार मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या. आपण या जिल्ह्यातील माता-भगिनींच्या तसेच प्रत्येकास आवश्यक असलेल्या पिण्याच्या पाण्याबद्दल आस्थेने चौकशी करून किती गावांना दररोज पाणी मिळते याबाबत माहिती घ्या. लहान गाव खेड्यांना जोडणारी रस्ते आपल्या देशातील महत्त्वाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांच्या शेत रस्त्यांचा प्रश्न, शेतीला मिळणाऱ्या विजेचा प्रश्न वन्य प्राण्यांपासून होत असणारे शेतीचे नुकसान विदर्भातील महत्वाकांशी जिगांव प्रकल्प, सरकारी शाळांमधून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच शिकवत असलेल्या शिक्षकांचेही प्रश्न शिकस्त झालेल्या शाळांच्या इमारती, मातृतीर्थ सिंदखेड राजा, जागतिक प्रसिद्ध असलेले लोणार सरोवर, श्री संत गजानन महाराज शेगाव येथील विकास आराखडा व त्यातील होणाऱ्या कामांची प्रगती, जिल्हातुन शेगांव ते पुणे मार्गे मुंबई जोडल्या जाणारा रेल्वे मार्ग खामगांव जालना रेल्वे मार्ग, औद्योगिक क्षेत्रास किती चालना मिळालेली आहे. याचाही आढावा आपण घ्यावा. आमच्या मनात खात्री आहे कीऔद्योगिक क्षेत्रातील आपण घेतलेल्या आढाव्याने बुलढाणा जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्धतेचे साधन निर्माण होईल. आपण येण्याने आयुष मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या उद्घाटना सोबतच वरील जिल्ह्यातील माताभगीनी अबालवृद्धांचे तसेच कास्तकारांपासून पगारदारांचे प्रश्न हे निश्चितपणाने मार्गी लागतील. या विषयावर आपणाशी चर्चा करण्याकरिता आपण आपल्या नियोजित दौऱ्यात मला वेळ द्यावा असे नमूद केले आहे.

Post a Comment
0 Comments