Type Here to Get Search Results !

खड्डा चुकवताना ट्रॅक्टरचा तोल गेला; चालक अभय येरमे जागीच ठार



मारेगाव | प्रतिनिधी

मार्डी परिसरात दुर्दैवी अपघातात ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टरचा तोल जाऊन वाहन उलटले आणि ट्रॅक्टरखाली दाबून चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना विद्युत वितरण कंपनीच्या सब-स्टेशनजवळ घडली.

मृत चालकाचे नाव अभय येरमे (वय अंदाजे २१ वर्षे, रा. मार्डी) असे आहे. अपघात इतका भीषण होता की, अभय यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

अभय येरमे हे कुटुंबातील एकुलते एक मुलगा असल्याने त्यांच्या निधनाने येरमे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.

अपघाताची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वारंवार अपघात घडत असल्याने तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments