Type Here to Get Search Results !

टिप्पर चालकांची मुजोरी; पत्रकार पोटे रक्ताळले!​ वणी-मारेगाव मार्गावर चाललंय काय? प्रशासनाचे दुर्लक्ष की चिरीमिरी?



​मारेगाव (प्रतिनिधी):वणी-मारेगाव मार्गावर धावणाऱ्या भरधाव टिप्परच्या मुजोरीमुळे काल दुपारी एक भीषण अपघात घडला. मारेगाव येथील पत्रकार ज्योतिबा पोटे हे आपल्या दुचाकीने वणीवरून परतत असताना, निंबाळा फाट्याजवळील टाटा मोटर्स शोरूम समोर एका भरधाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक (Overtake) केले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे पोटे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ते रस्त्यावर जोरात आदळले.

​टिप्परच्या वेगाचा बसला फटका

मिळालेली माहिती अशी की, शनिवारी २६ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास पोटे हे बँकेचे काम आटोपून मारेगावकडे येत होते. याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एका टिप्परने अतिशय वेगात आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. टिप्पर अंगावर येत असल्याचे पाहून पोटे यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी दुचाकी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला, मात्र वेगामुळे नियंत्रण सुटून ते दुचाकीसह फरफटत गेले.

​चेहरा रक्ताळला, पण हेल्मेटने वाचवला जीव

या अपघातात पोटे यांच्या चेहऱ्याला, नाकाला आणि शरीराला गंभीर जखमा झाल्या आहेत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पोटे यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, जर पोटे यांच्या डोक्यावर हेल्मेट नसते, तर टिप्परच्या त्या धक्क्याने किंवा खाली पडल्याने डोक्याला गंभीर इजा होऊन मोठा अनर्थ घडला असता. केवळ सुरक्षेच्या नियमांमुळे आज ते मृत्यूच्या दाढेतून परत आले आहेत.

​प्रशासनाने मुजोर टिप्पर चालकांवर लगाम लावावा!

वणी-मारेगाव मार्गावर टिप्पर चालकांची मुजोरी वाढली असून, ओव्हरटेक करण्याच्या नादात अनेकांचे जीव धोक्यात येत आहेत. या घटनेमुळे मारेगावच्या पत्रकार वर्तुळात आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. दोषी टिप्पर चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे


Post a Comment

0 Comments