मुलांनो लेखक बना, कवी बना' - पुर्णिमा नार्वेकर
प्रविण कुंटे ग्रामीण प्रतिनीधी उमरखेड
उमरखेड : 'मुलांनो मराठी राजभाषेचे वैभव वाढवायचे तर दररोज नवनवीन विषयावर किमान दोन ओळी तरी लिहुन काढा. तुम्हाला डॉक्टर, वकील शिक्षक जे व्हायचे ते व्हा पण सोबत लेखक बना, कवी बना' असे आवाहन मुंबईच्या प्रख्यात साहित्यिक पुर्णिमा नार्वेकर यांनी केले तालुक्यातील विडूळ नवी आबादी शाळेत मराठी राजभाषा गौरव दिनाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. थेट मुंबईतून तीन मराठी महिला साहित्यिकांची मांदियाळी विडूळ आबादी शाळेत अवतरली होती.
गौरव दिन आपल्या अभिनव महाराष्ट्रभर उपक्रमासाठी नावलौकिक मिळवलेल्या विडूळ नवी आबादी शाळेत यानिमित्ताने एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दहिसर पश्चिम मुंबईच्या प्रख्यात साहित्यिक व निवेदिका पुर्णिमा नार्वेकर, नायर रुग्णालय मुंबई तथा सुयश हॉस्पिटलच्या एम डी मेडीसिन असलेल्या डॉ. माधवी चिटणीस व नालासोपाऱ्यातील उपक्रमशील शिक्षिका निलिमा लोहोट ह्या विशेष भेटीसाठी विडूळ नवी आबादी येथे आल्या होत्या. शाळेच्या कायापालटाने प्रभावित होऊन ही मंडळी खास अभ्यास दौऱ्यावर आली होती.

Post a Comment
0 Comments