पत्रकारिता क्षेत्रात सातत्यपूर्ण, प्रामाणिक आणि समाजाभिमुख कार्य करणारे संतोष किसन बोरुडे यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडत त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवेचा ध्यास घेतला आहे.
संतोष बोरुडे हे विश्वकर्मा न्यूज पेपर एजन्सीचे अधिकृत वृत्तपत्र विक्रेते असून, ते साप्ताहिक बीड संचार मध्ये अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. तसेच दैनिक नवराष्ट्र मध्ये मुक्त वार्ताहर म्हणूनही ते विविध घडामोडींचे वृत्तांकन करत आहेत. कामरगाव, डेडलाईन्स व परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, कृषी व स्थानिक समस्या यांवर त्यांनी सातत्याने प्रकाश टाकला आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेत 2024 साली त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यामध्ये राज्यस्तरीय इंडियन एक्सलन्स अवॉर्ड (दैनिक अहिल्याराज), राष्ट्रीय आदर्श पत्रकारिता भूषण पुरस्कार (प्रेस मीडिया लाईव्ह, पुणे) तसेच अटल बिहारी वाजपेयी सेवा रत्न पुरस्कार (जीवन जागृती सेवा संस्था व MSME मंत्रालय, भारत सरकार) यांचा समावेश आहे. या सन्मानांमुळे त्यांच्या कार्याची व्यापक पातळीवर दखल घेतली गेली आहे.
याशिवाय 2025 साठी पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची नोंद घेऊन मानस डॉक्टरेट पदवी (पत्रकारिता) साठी त्यांची निवड करण्यात आली आहे, ही त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाची उपलब्धी मानली जात आहे.
ग्रामीण पत्रकारितेत प्रामाणिकपणा, वेग आणि वस्तुनिष्ठता जपत संतोष बोरुडे हे समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या कार्यामुळे स्थानिक पातळीवरील प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचण्यास मदत होत असून, सर्व स्तरांतून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments