यवतमाळात थाळीनाद आंदोलन; निष्पक्ष चौकशी व दोषींना अटक करण्याची जोरदार मागणी
प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे दवंडी वार्तापत्र
यवतमाळ :
खरात प्रकरणी निष्पक्ष, पारदर्शक व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता राज्यभरातून जोर धरत असून, याच पार्श्वभूमीवर यवतमाळ शहरातील महिलांनी आक्रमक भूमिका घेत थाळीनाद आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला धारेवर धरले. शहरातील विविध बस्त्यांमध्ये जाऊन जनजागृती करत महिलांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलेल्या काही प्रकरणांमध्ये प्रभावशाली व्यक्तींवरही कारवाई झाल्याचे उदाहरण देत, महाराष्ट्रातही खरात प्रकरणात कोणताही दबाव न मानता निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. “कायद्यासमोर सर्व समान असताना कारवाईत विलंब का?” असा थेट सवाल उपस्थित करत महिलांनी प्रशासनाला जबाबदार धरले.थाळीनादाने दणाणले यवतमाळ; घोषणांनी व्यक्त झाला संतापयवतमाळ शहरातील आदिवासी सोसायटी परिसरात पार पडलेल्या या आंदोलनात महिलांनी थाळीनाद करत जोरदार घोषणाबाजी केली.
“दोषींना तात्काळ अटक करा”, “निष्पक्ष चौकशी करा”, “महिलांना न्याय द्या” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.आंदोलनकर्त्यांनी संबंधित व्यक्तींना सहआरोपी करून तातडीने अटक करण्याची मागणीही केली.बस्त्यांमध्ये जाऊन जनजागृती; नागरिकांना माहिती देण्याचा प्रयत्नआंदोलन केवळ एका ठिकाणी मर्यादित न ठेवता महिलांनी शहरातील विविध वस्त्यांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधला. खरात प्रकरणाची माहिती देत त्यांनी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.थाळीनादाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधत हा लढा व्यापक करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवरया आंदोलनातून राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये तातडीने आणि निष्पक्ष कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली.“विलंब म्हणजे अन्याय” असे स्पष्ट सांगत महिलांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
महिला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभागया आंदोलनात विद्या परचाके, लता हुमने, कल्पना कुलसंगे, छाया मडावी, संगीता मडावी, मीना केलकर, जया मडावी, अनिता सलाम, रेखा उइके, वीणा कुडमेथे, साविता तोडसाम यांच्यासह मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
यावेळी एकजुटीने लढा देण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.आंदोलन तीव्र करण्याचा इशाराप्रशासनाने या प्रकरणात तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.“न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही,” असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.
खरात प्रकरणी उभा राहिलेला हा जनआक्रोश केवळ एका घटनेपुरता मर्यादित नसून, तो न्यायव्यवस्थेवरील विश्वासाशी निगडित आहे.प्रभावशाली व्यक्तींवरही समान निकषांवर कारवाई झाली पाहिजे, हीच लोकशाहीची खरी कसोटी आहे.निष्पक्ष तपास, वेळेत न्याय आणि कठोर कारवाई हीच आजच्या परिस्थितीची गरज आहे.

Post a Comment
0 Comments