महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे दवंडी वार्तापत्र
सध्या सोशल मीडियावर इंधन तुटवड्याबाबत विविध अफवा पसरत असताना महागाव प्रशासनाने यावर स्पष्टीकरण देत नागरिकांना दिलासा दिला आहे. शासनाकडून किंवा तेल कंपन्यांकडून इंधन पुरवठा खंडित होणार असल्याची कोणतीही अधिकृत सूचना प्राप्त झालेली नसल्याचे तहसीलदार अभय मस्के यांनी स्पष्ट केले आहे.
तहसील प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही घाईगडबड करू नये. विनाकारण पेट्रोल पंपांवर गर्दी केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे अनावश्यक रांगा टाळाव्यात, असेही आवाहन करण्यात आले आहे.
सध्या इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू असून नागरिकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे. अफवा पसरविणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने शांतता राखत योग्य माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन तहसीलदार अभय मस्के यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments