Type Here to Get Search Results !

वारकरी सेवेसाठी विठोबा दादा आवारे यांना “समाज भूषण” पुरस्कार

 



प्रतिनिधी  :गणेश ठाकरे, लासलगाव 

  वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्रात प्रचार - प्रसार करणारे विठ्ठल - रखुमाई ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य, वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा मार्गदर्शक, भागवत कथाकार ह.भ.प विठोबा दादा आवारे यांच्या अध्यात्मिक, सामाजिक व समाजोपयोगी कार्याची दखल घेत साई धनवर्षा फाउंडेशनच्यावतीने त्यांना “समाज भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

        साई धनवर्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय देशमुख यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक, सामाजिक, शासकीय, सांस्कृतिक, राजकीय, पत्रकारिता तसेच उद्योजक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा गौरव करत हा सन्मान नाशिक येथे आयोजित “वारकरी रत्न सन्मान सोहळा” कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

 कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मिनू नरेश धाम (अमूल मास्टर शेफ इंडिया – सीझन ४ टॉप फायनालिस्ट, स्टार प्लस), प्रितीताई अमित सावंत (संस्थापिका अध्यक्षा, पुणे मानवाधिकार ग्लोबल ह्यूमन वेलफेअर ऑर्गनायझेशन), प्रियंका राकेश दोंदे (नगरसेविका, नाशिक), आशाताई पाटील (राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष, ग्राहक रक्षक समिती), राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरला दीदी (कोपरगाव), राधाकृष्ण सखाराम नाईकवाडे (चेअरमन, श्री समर्थ सहकारी बँक लि. नाशिक), शरयू ताई नागरी सहकारी पतसंस्था अंबडचे संस्थापक चेअरमन, युवा उद्योजक कैलास धीरवाणी, ज्योती केदारे शिंदे (मिसेस युनिव्हर्स विनर २०२४), अंजली भालचंद्र जोशी (महिला हक्क व महिला सक्षमीकरण), अभिनेता व निर्माता पंकज ठाकूर, युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष व वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments