Type Here to Get Search Results !

प्रभाग १ मध्ये दारू दुकानावरून पेटला संघर्ष,


 

महिलांचा एल्गार, १६ एप्रिलला होणार निर्णायक मतदान पत्र लपविल्याचा आरोप, आमिष देऊन आंदोलन मोडण्याचे प्रयत्न, प्रशासनावर गंभीर प्रश्न

प्रतिनिधी महागांव   विवेक नरवाडे दवंडी वार्तापत्र 

महागांव शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये देशी दारू दुकानाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या तैलचित्रालगत वर्दळीच्या चौकात देशी दारू विक्रीच्या दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आल्याने स्थानिक महिलांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. या दुकानासोबतच शेजारील वाईन बार बंद करण्यासाठी महिलांनी आता उघडपणे लढा पुकारला असून, हा संघर्ष आता थेट मतदानापर्यंत पोहोचला आहे.

महिलांचा एल्गार, दारू दुकान हटवा ची ठाम भूमिका

प्रभागातील महिलांनी एकत्र येत दारू दुकानाविरोधात आवाज उठवला आहे.

आमच्या वस्तीत दारू नकोच! अशी स्पष्ट भूमिका घेत महिलांनी निवेदन देत प्रशासनाला इशारा दिला होता.

यामुळे हा प्रश्न केवळ स्थानिक पातळीवर न राहता आता संपूर्ण शहराचा चर्चेचा विषय बनला आहे.

पत्र पंधरा दिवस लपवले? संशयाची पाल चुकचुकली

या प्रकरणाला नवा वळण तेव्हा मिळाले, जेव्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाने मतदान प्रक्रियेबाबत महागांव नगरपंचायतीला पाठवलेले पत्र पंधरवडाभर गोपनीय ठेवल्याचा आरोप समोर आला.

नगरसेविका जयश्री नरवाडे यांनी थेट प्रश्न उपस्थित करत म्हटले की,

इतक्या महत्त्वाच्या विषयाचे पत्र पंधरा दिवस लपवून ठेवण्यामागे नेमकं कारण काय?

त्यांनी विभागाकडे विचारणा केली असता, पत्र आधीच पाठवले असल्याचे स्पष्ट झाले.

यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर संशयाचे सावट अधिक गडद झाले आहे.

आमिषांचे राजकारण, आंदोलन मोडण्याचा प्रयत्न?

दरम्यान, महिलांचा लढा मोडण्यासाठी काही राजकीय समाजकंटक सक्रिय झाल्याची चर्चा गावभर रंगली आहे.

काही महिलांना पैशांचे आमिष तर काहींना विविध लाभांचे आश्वासन

तर काही ठिकाणी दबाव तंत्र

अशा प्रकारे आडव्या बाटलीचा लढा उधळण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या प्रकरणात काही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील भ्रष्ट प्रवृत्तींचा पडद्याआड सहभाग असल्याचीही चर्चा रंगली आहे.

45 सह्या वैध, मतदानाचा मार्ग मोकळा

महिलांनी दिलेल्या निवेदनातील सह्यांची ७ मार्च रोजी सावित्रीबाई फुले विद्यालयात पडताळणी करण्यात आली.त्यामध्ये एकूण 45 सह्या वैध ठरल्या. ही संख्या आवश्यक मर्यादेपेक्षा अधिक असल्याने जिल्हाधिकारी विकास मीना यांनी गुप्त मतदान घेण्याचे आदेश दिले.

१६ एप्रिलला मतदान, गावाचा निर्णय पेटीतून ठरणार

आता या संघर्षाचा अंतिम टप्पा जवळ आला असून,

 १६ एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत मतदान होणार

 ठिकाण – सावित्रीबाई फुले कन्या शाळा

 सायंकाळी ४ वाजता मतमोजणी व निकाल

या मतदानातूनच दारू दुकान राहणार की बंद होणार, याचा निर्णय होणार आहे.

महत्त्वाच्या ठिकाणी दारू दुकान, संताप वाढला

विशेष म्हणजे, हे दारू दुकान वर्दळीच्या चौकात, तसेच कै. वसंतराव नाईक यांच्या तैलचित्रालगत सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी अधिकच वाढली आहे.इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी दारू दुकान कसं? असा सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

प्रशासनावर प्रश्नचिन्ह, पारदर्शकतेची मागणी

पत्र लपवणे, विलंब करणे आणि महिलांना माहिती न देणे या सगळ्या प्रकारामुळे नगरपंचायत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आंदोलक महिलांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,न्याय न मिळाल्यास आम्ही मोठे आंदोलन उभे करू.

प्रभाग १ मधील हा संघर्ष केवळ दारू दुकानापुरता मर्यादित नाही, तर तो महिलांच्या सन्मानाचा आणि समाजाच्या आरोग्याचा प्रश्न बनला आहे.

लोकशाही पद्धतीने मतदान होणे ही सकारात्मक बाब असली, तरी त्यात पारदर्शकता आणि निष्पक्षता राखणे अत्यावश्यक आहे.


शेवटचा सवाल…

 महिलांचा आवाज जिंकणार की पैशाची ताकद?

 दारू दुकान बंद होणार की पुन्हा एकदा व्यवस्था जिंकणार?

आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते १६ एप्रिलच्या निकालाकडे!


Post a Comment

0 Comments