पिंपळगाव कौडा (ता. नगर, जि. अहिल्यानगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन गावच्या सरपंच प्रतिभा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. शिक्षण विस्तार अधिकारी रविंद्र कापरे (पंचायत समिती अहिल्यानगर), केंद्र प्रमुख अंबादास गारुडकर (चास केंद्र), शिक्षणाधिकारी (माध्यमिक )अशोक कडूस (मुंबई) तसेच केंद्र प्रमुख भास्कर नरसाळे (टाकळी काजी केंद्र) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी मुख्याध्यापक श्रीम.आशा कापरे मॅडम पदवीधर शिक्षिका रोहकले कविता मॅडम उपाध्यापिका श्रीम.मंजुषा नरवाडे मॅडम, उपाध्यापक श्री. रामदास पानसरे सर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन केले . विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण शेरकर सर व रवींद्र गुंजाळ सर यांनी केले. या स्नेहसंमेलनाला शाळेचे माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य व अध्यक्ष तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होत असून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व शिक्षक व आयोजकांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

Post a Comment
0 Comments