पिंपळगाव कौडा (वार्ताहर)येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळगाव कौडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.
विद्यार्थ्यांनी भाषणे, कविता व घोषवाक्यांद्वारे आंबेडकरांच्या विचारांचे प्रभावी सादरीकरण केले. मुख्याध्यापकांनी शिक्षण, समता व सामाजिक न्यायाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी संविधान पालनाची शपथ घेण्यात आली. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

Post a Comment
0 Comments