Type Here to Get Search Results !

निवेदनांचा ढिगाराआंदोलनांचाज्वालामुखी तरीही कुलूपबंद तलाठी कार्यालय! जनतेच्या हक्कांवर प्रशासनाची सरळ गदा



साफसफाई-वीजेचा दिखावा;अधिकारी मात्र बेपत्ता जबाबदारी पासून पळजनतेचासंताप टोकाला

*प्रविण कुंटे उमरखेड प्रतिनिधी 

 उमरखेड  :  बाळदी येथील तलाठी कार्यालयाचा प्रश्न आता केवळ दुर्लक्षाचा राहिलेला नाही; तो थेट जनतेच्या हक्कांवर लादलेला कुलूपबंद अन्याय ठरत आहे. ५ एप्रिल २०२३ रोजी प्रहार संघटनेने दिलेल्या निवेदनानंतर प्रशासनाने तत्परतेचा आव आणत कार्यालय परिसराची साफसफाई केली, वीज व्यवस्था सुरू केली—पण हे सर्व आज उघडपणे दिखावा ठरत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

दोन वर्षांचा कालावधी उलटूनही तलाठी कार्यालय नियमित सुरू झालेले नाही. संबंधित अधिकारी कार्यालयात हजर राहत नसल्याने ग्रामस्थांना शासकीय कामांसाठी अक्षरशः दरदर भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाच्या या निष्क्रियतेमुळे नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे.

निवेदनं झाली, आंदोलनं झाली, बातम्या झळकल्या—तरीही प्रशासन झोपेतच का? जनतेच्या आवाजाला किंमत नाही का? “निवेदनं म्हणजे फक्त कागदाचा तुकडा आणि बातम्या म्हणजे क

Post a Comment

0 Comments