Type Here to Get Search Results !

दिल्लीपर्यंत पोहचले नाव… नितीन भाऊ भुतडा विधान परिषदेत? राजकीय पटावर नवी चाल; नितीन भाऊ भुतडा यांच्या नावाने जिल्ह्यात खळबळ देवेंद्र फडणवीस यांची जादू चालणार का? — कार्यकर्त्यांत उत्सुकता



विवेक नरवाडे दवंडी वार्तापत्र महागांव–उमरखेड प्रतिनिधी

महागांव : राजकारणात कधी कोणता पत्ता कधी टाकला जाईल, हे सांगता येत नाही. पण काही नावे अशी असतात, जी चर्चेत आली की संपूर्ण राजकीय पट हलतो. सध्या यवतमाळ–वाशिम जिल्ह्यात अशीच एक चर्चा धगधगत आहे—भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा यांची विधान परिषद आमदारपदी निवड होणार का?

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर हालचालींना वेग आला असतानाच, मुंबईतून संभाव्य उमेदवारांची नावे बाहेर आली… आणि त्या यादीत काही परिचित चेहरे दिसले. मात्र, नितीन भाऊ भुतडा नाव कुठं? हा प्रश्न जिल्हाभरातील कार्यकर्त्यांच्या चर्चेचा केंद्रबिंदू बनला.पण राजकारणात जे दिसतं तेच अंतिम असतं, असं नाही. पडद्यामागे खेळणाऱ्या डावपेचांची खरी गोष्ट पुढे येताच वातावरणाने अचानक कलाटणी घेतली—दिल्लीकडे पाठवलेल्या यादीत नितीन भाऊ भुतडा यांचे नाव असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली!

तीन नावांची चर्चा… पण ‘भुतडा फॅक्टर’ भारी!

भाजपच्या संभाव्य यादीत जिल्ह्यातून तीन नावे पुढे आल्याचे सांगितले जातेनितीन भाऊ भुतडाडॉ. आरतीताई फुपाटेमाजी आमदार निलय भाऊ नाईकही तिन्ही नावे वजनदार असली, तरी संघटनात्मक ताकद, गाठीभेटी आणि निवडणूक गणित यांचा विचार करता नितीन भाऊ भुतडा यांचे पारडे जड मानले जात आहे.कारण हे फक्त नाव नाही… तर एक राजकीय समीकरण आहे.

ज्याला भुतडा भाऊंचा हात… त्याचं नशिब फाटतं!

गेल्या दशकभरात महागांव–उमरखेड मतदारसंघात एक गोष्ट वारंवार दिसून आलीनितीन भाऊ भुतडा यांनी ज्याच्या नावावर शिक्कामोर्तब केलं, तो उमेदवार निवडून आला!माजी आमदार राजेंद्र नजरधने माजी आमदार नामदेवराव ससानेसध्याचे आमदार किसनराव वानखेडेही फक्त नावे नाहीत… तर भुतडा भाऊंच्या राजकीय सूजबूज आणि मैदानातील पकडीची साक्ष आहेत.

वानखेडेंचा उदय—भुतडा भाऊंची मुंबई दरबारी चाल

राजकारणात योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं असतं.जेव्हा नामदेवराव ससाने यांचा कार्यकाळ संपत आला आणि मतदारांमध्ये असंतोष वाढू लागला, तेव्हा नितीन भाऊ भाऊंनी एक मोठा डाव टाकला.त्यांनी मुंबईच्या दरबारात जाऊन किसनराव वानखेडे यांची शिफारस केली.

आणि काय घडलं?

उमेदवारी मिळाली… निवडणूक झाली… आणि मतदारांनी दणदणीत विजय दिला!हीच ती चाल… ज्यामुळे आज नितीन भाऊंचं नाव दिल्लीपर्यंत पोहोचलं आहे.

संघटन उभं केलं, जाळं विणलं… आणि विश्वास जिंकला

भाजपने जेव्हा नितीन भाऊ भुतडा यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली, तेव्हा अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.पण काही वर्षांतच त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात पक्षाचं जाळं इतकं मजबूत केलं की, आज प्रत्येक गावात भाजपचा झेंडा दिसतो.कार्यकर्त्यांशी थेट संपर्क, प्रत्येक निवडणुकीत सक्रिय सहभाग, आणि संघटन उभारण्याची जिद्दया गुणांमुळे भुतडा भाऊंनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

फडणवीस साहेबांचा विश्वासू — मोठं समीकरण!

राजकारणात वरच्या पातळीवर पोहोचण्यासाठी केवळ स्थानिक ताकद पुरेशी नसते… तर वरच्या नेतृत्वाचा विश्वासही तितकाच महत्त्वाचा असतो.नितीन भाऊ भुतडा यांची ओळख आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी अशी झाली आहे.फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करताना भुतडा भाऊंनी केवळ आदेश पाळले नाहीत, तर परिणामही दाखवून दिले.यामुळेच त्यांच्या नावाला आता दिल्ली दरबारातही वजन प्राप्त झाल्याची चर्चा आहे.

दिल्लीकडे नजर… अंतिम शिक्का कुणावर?

सध्या संपूर्ण जिल्ह्याची नजर दिल्लीकडे लागली आहे.

तिकीट कोणाला मिळणार?अंतिम नाव कोणाचं जाहीर होणार?

या प्रश्नांची उत्तरं अजून मिळायची आहेत. पण कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा—यावेळी भुतडा भाऊंचीच लॉटरी लागणार!उमरखेड–महागांवला दोन आमदार मिळणार?जर नितीन भाऊ भुतडा विधान परिषदेत गेले, तर एक अनोखं समीकरण तयार होईल

विधानसभा आमदार : किसनराव वानखेडे

विधान परिषद आमदार : नितीन भाऊ भुतडायामुळे महागांव–उमरखेड मतदारसंघाला दोन आमदारांचे बळ मिळेल, अशी चर्चा रंगली आहे.

कार्यकर्त्यांत जल्लोषाची तयारी!

जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे.नितीन भाऊ आमदार झालेच पाहिजेत अशी भावना गावोगावी व्यक्त होत आहे.काही ठिकाणी तर कार्यकर्त्यांनी आधीच जल्लोषाची तयारी सुरू केल्याचेही बोलले जात आहे.

राजकीय संदेश—मेहनत कधीच वाया जात नाही

नितीन भाऊ भुतडा यांची राजकीय वाटचाल पाहिली, तर एक गोष्ट स्पष्ट दिसतेसततची मेहनत, संघटनावर पकड आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय यामुळेच आज ते या टप्प्यावर पोहोचले आहेत.

नितीन भाऊ—पुढचा मोठा चेहरा?

यवतमाळ–वाशिम जिल्ह्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न घुमतोयभुतडा भाऊ विधान परिषदेत जाणार का?

उत्तर अजून अधिकृत नाही…

पण परिस्थिती, चर्चा आणि राजकीय गणित पाहता एक गोष्ट नक्की—जर दिल्ली दरबारातून हिरवा कंदील मिळाला, तर नितीन भाऊ भुतडा हेच पुढचे विधान परिषद आमदार असतील!


आता फक्त प्रतीक्षा… अंतिम निर्णयाची!


Post a Comment

0 Comments