कामरगाव (वार्ताहर) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुणवत्तापूर्ण व प्रभावी शिक्षण मिळावे, या उद्देशाने नोबल मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर, अहिल्यानगर यांच्या वतीने जि. प. प्राथमिक शाळा, पिंपळगाव कौडा येथे ६५ इंच स्मार्ट इंटरऍक्टिव्ह पॅनल भेट देण्यात आले.
या अत्याधुनिक पॅनलमुळे शाळेतील अध्यापन पद्धतीत सकारात्मक बदल होणार असून शिक्षकांना ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमातून विषय अधिक सोप्या, समजण्यास सुलभ आणि आकर्षक पद्धतीने मांडता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढून त्यांच्या आकलन क्षमतेत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
डिजिटल साधनांच्या वापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबद्दलची आवड निर्माण होऊन त्यांचा सर्वांगीण विकास साध्य होणार आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये अशा सुविधा उपलब्ध होणे ही शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाची व सकारात्मक पायरी मानली जात आहे.
या उपक्रमासाठी डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. सुंदर गोरे, डॉ. नानासाहेब अकोलकर, डॉ. डौले, पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी तसेच शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांचे मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य लाभले.
या प्रसंगी शाळेतील शिक्षक आशा कापरे, कविता रोहोकले, मंजुषा नरवडे, प्रविण शेरकर, रामदास पानसरे, रविंद्र गुंजाळ तसेच माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष महेश गंधे उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments