Type Here to Get Search Results !

मतदार यादी पुनर्निरीक्षणासाठी आज हनुमान मंदिरात बीएलओ कॅम्पला नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद नगरसेविका जयश्री ताई नरवाडे यांचे विशेष सहकार्य



महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे दवंडी वार्तापत्र 

महागांव मतदार यादीच्या विशेष पुनर्निरीक्षण (एस.आय.आर.) मोहिमेअंतर्गत आज दि. ०७ एप्रिल २०२६ रोजी मंगळवार सकाळी ९ वाजता हनुमान मंदिर येथे बी.एल.ओ. (बूथ लेव्हल ऑफिसर) यांचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता

या कॅम्पमध्ये मतदारांना आपली नावे तपासणे, दुरुस्ती करणे, नव्याने नोंदणी करणे तसेच इतर आवश्यक बदल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व मतदार बंधू-भगिनींनी आपले मतदान ओळखपत्र (वोटर आयडी) सोबत घेऊन या कॅम्पमध्ये उपस्थित होते

नगरसेविका सौ. जयश्री संजय नरवाडे यांनी नागरिकांना या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले असून, अचूक व अद्ययावत मतदार यादीसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे त्यांनी नमूद केले आहे.

लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराची नोंद अचूक असणे गरजेचे असल्याने नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments