16 एप्रिलला महिलांचा कौल ठरणार! जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रक्रिया; सावित्रीबाई फुले कन्या शाळेत होणार मतदान व मतमोजणी
दवंडी वार्तापत्र महागाव प्रतिनिधी – विवेक नरवाडे
महागांव मतदार यादीच्या विशेष पुनर्निरीक्षण (एस.आय.आर.) मोहिमेअंतर्गत आज दि. ०७ एप्रिल २०२६ रोजी मंगळवार सकाळी ९ वाजता हनुमान मंदिर येथे बी.एल.ओ. (बूथ लेव्हल ऑफिसर) यांचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता
या कॅम्पमध्ये मतदारांना आपली नावे तपासणे, दुरुस्ती करणे, नव्याने नोंदणी करणे तसेच इतर आवश्यक बदल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व मतदार बंधू-भगिनींनी आपले मतदान ओळखपत्र (वोटर आयडी) सोबत घेऊन या कॅम्पमध्ये उपस्थित होते
नगरसेविका सौ. जयश्री संजय नरवाडे यांनी नागरिकांना या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले असून, अचूक व अद्ययावत मतदार यादीसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे त्यांनी नमूद केले आहे.
लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराची नोंद अचूक असणे गरजेचे असल्याने नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments