अहिल्यानगर | प्रतिनिधी...
कामक्षा माता सार्वजनिक वाचनालय, कामरगाव (अहिल्यानगर) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाची सुरुवात वाचनालयाचे अध्यक्ष मा. संजय वेताळ यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले . त्यानंतर संस्थेचे संस्थापक व कार्यवाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचारांवर तसेच भारतीय संविधानाच्या महत्त्वावर आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी ग्रंथपाल पल्लवी वेताळ, सहाय्यक ग्रंथपाल यश वेताळ, संस्थेचे पदाधिकारी रघुनाथ वेताळ, अनिल गुंजाळ तसेच कामरगाव इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या महान कार्याला अभिवादन केले.

Post a Comment
0 Comments