Type Here to Get Search Results !

लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांची इंटर ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग चॅम्पियनशिप साठी निवड

 



प्रतिनिधी : गणेश ठाकरे लासलगाव

    लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित लोकनेते दत्ताजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील एनसीसी विभागातील विद्यार्थ्यांची २५ एप्रिल पासून सुरू होणाऱ्या विभाग स्तरावरील इंटर ग्रुप स्पोर्ट्स सिलेक्शन चॅम्पियनशिप कॅम्प मुंबई या शिबीरासाठी निवड झाली आहे . कॅडेट सोहम भालेराव व कॅडेट सायली गोमासे या विद्यार्थ्यांची सेवन महाराष्ट्र बटालियन एनसीसी नाशिक मधून निवड झाली आहे .सदर विद्यार्थी दिनांक २५ एप्रिल ते २७ एप्रिल २०२६ मुंबई या ठिकाणी सुरू होणाऱ्या इंटर ग्रुप स्पोर्ट सिलेक्शन चॅम्पियनशिप शिबिरात सहभागी होणार आहे . सदर कॅम्प मध्ये संपूर्ण मुंबई विभागातून विद्यार्थी सहभागी होणार आहे सदर विद्यार्थ्यांची रायफल शूटिंग स्पर्धेत निवड झालेली आहे.


   या निवडीबद्दल सेवन महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे कमांडिंग ऑफिसर एम एस केरूला व ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर तनिष्क गौर संस्थेच्या अध्यक्षा नीताताई पाटील , विद्यालयाचे प्राचार्य विजय वाणी , मुख्याध्यापिका शारदा केदार तसेच क्रिडा शिक्षक व एनसीसी ऑफिसर प्रमोद पवार यांनी विद्यार्थ्यांना शब्दरूपी शुभेच्छा देऊन यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

     या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाच्या अध्यक्षा नीता पाटील, सचिव संजय पाटील , उपाध्यक्ष निवृत्ती गायकर ,संचालक अभय पाटील , सिताराम जगताप , लक्ष्मण मापारी ,.कैलास ठोंबरे इतर सर्व सन्माननीय संचालक मंडळ सदस्य , विद्यालयाचे प्राचार्य विजय वाणी, सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे . याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. सदर विद्यार्थ्यांला विद्यालयाचे एनसीसी विभाग प्रमुख प्रमोद पवार व क्रिडा शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.


Post a Comment

0 Comments