Type Here to Get Search Results !

दोषी कनिष्ठ अभियंता प्रवीण सलामे वर निलंबनाची कारवाई कधी तक्रारकरत्यांचा सवाल

 



महागांव  प्रतिनिधी  विवेक  नरवाडे दवंडी वार्तापत्र 


 तालुक्यातील विकास कामांमध्ये झालेल्या अनियमित्येच्या पार्श्वभूमीवर कनिष्ठ अभियंता प्रवीण सलामे यांच्यावर कार्यवाही करण्या साठी मागणी जोर धरू लागली आहे विविध विकास कामाच्या भ्रष्टाचार प्रकरणात सलामे दोषी आढळून आल्या नंतरही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या कडून अद्याप ही निलंबनाची कारवाई न झाल्याने तक्रारकर त्यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे 

 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्या नंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे संकेत दिले होते मात्र चौकशी अहवाल गेल्या दहा ते पंधरा दिवसा पासून पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परिषद कडे सादर झाल्या नंतर ही जिल्हा परिषद प्रशासना कडून ठोस निर्णय घेतला गेला नसल्याने निलंबनाची कारवाईला विलंब का असा प्रश्न उपस्थित होत आहे तक्रार कर्त्यांच्या मते पंचायत समितीचा कनिष्ठ अभियंता सलामे यांच्या कामकाजात गंभीर तुरटी आढळून आली असून शासनाच्या निधीचा विविध विकास कामात भ्रष्टाचार झाल्याची पुष्टी एक ते चार प्रस्तावां मध्ये नमूद करण्यात आली आहे त्या मुळे पारदर्शकता राहण्यासाठी सलामे यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई आवश्यक आहे तक्रारकर्त्यांनी आता सलामे विरुद्ध कार्यवाही न झाल्यास जिल्हा परिषद कार्यालया समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे शासनाच्या निधीची अपहार झाल्याचे उघडकीस आल्या नंतरही आतापर्यंत कारवाई का करण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे त्यामुळे पारदर्शकता राखण्या साठी कनिष्ठ अभियंता सलामे वर त्वरित निलंबनाची कारवाई करणे आवश्यक आहे दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन दोषी आढळणाऱ्या सलामे विरुद्ध निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी तक्रारकर्त्यातून करण्यात आली आहे जिल्हा परिषद प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे तक्रारकरत्यांचे लक्ष लागले आहेत येत्या तीन ते चार दिवसात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून कारवाई न झाल्यास तक्रार करते जिल्हा परिषद कार्यालय समोर आमरण उपोषणास बसणार आहेत


Tags

Post a Comment

0 Comments