प्रतिनिधी महागांव विवेक नरवाडे दवंडी वार्तापत्र
महागांव :
शेतीत आता जुन्या पद्धतीवर चालून भागणार नाही. शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीकडे वळले, तर कमी वेळात आणि कमी खर्चात चांगला पैसा हातात येऊ शकतो, असे ठाम मत युवा शेतकरी बाळू पाटील नरवाडे यांनी व्यक्त केले. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी बदल स्वीकारणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
३० ते ९० दिवसांत पैसा हातात नरवाडे म्हणाले, भाजीपाला पिके १ ते ३ महिन्यांत तयार होतात
लगेच विक्री करून रोख पैसे मिळतात पारंपरिक पिकांपेक्षा (गहू, तांदूळ) जास्त नफा मिळतो
शेतकरी वर्षभर थांबून न राहता सतत उत्पन्न घेऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. टमाटे, कोबी, कारले – नगदी पिकांचा पर्याय
महागांव तालुक्यातील शेतकऱ्यांनी टमाटे कोबी, फ्लॉवर कारले, दोडका, काकडी यांसारख्या पिकांकडे वळल्यास चांगला फायदा होऊ शकतो. या पिकांना बाजारात कायम मागणी असल्याने दरही चांगले मिळतात.मांडव पद्धतीने उत्पादन दुप्पट वेलवर्गीय भाजीपाला घेताना मांडव पद्धत वापरल्यास पिके चांगली वाढतात दर्जेदार उत्पादन मिळते उत्पन्न वाढते थोडा खर्च करा पण उत्पादन वाढवा, असा सल्लाही त्यांनी दिला.
सेंद्रिय शेतीकडे कल वाढव सेंद्रिय खतांचा वापर केल्यास जमीन सुपीक राहते भाजीपाला निरोगी व दर्जेदार होतो बाजारात जास्त दर मिळतो म्हणून शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवर अवलंबून न राहता सेंद्रिय शेतीकडे वळावे, असेही त्यांनी सांगितले.
आधुनिक शेतीशिवाय पर्याय नाही आजच्या काळात ठिबक सिंचन मल्चिंग हरितगृह या तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय शेतीत टिकणे कठीण आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. बाजार पाहूनच लागवड करा
कोणत्या भाजीला मागणी आहे, दर कसे आहेत, हे आधी बघा आणि मगच लागवड करा, असा सल्ला देत त्यांनी शेतकऱ्यांना बाजारपेठेचा अभ्यास करण्याचे आवाहन केले.
महागांव तालुक्यातील शेतकरी सध्या वाढते खर्च, हवामानातील बदल आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे अडचणीत सापडला आहे. अशा वेळी भाजीपाला लागवड हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
कमी वेळात पैसा मिळवायचा असेल, तर शेतीत बदल करणे अपरिहार्य आहे. भाजीपाला शेती हीच आता अनेक शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर ठरू शकते.
जमीन कमी असली तरी चालेल, पण विचार मोठा ठेवा; भाजीपाला उत्पादन घ्या आणि उत्पन्न वाढवा, असा संदेश बाळू पाटील नरवाडे यांनी दिला.

Post a Comment
0 Comments