Type Here to Get Search Results !

कामरगावच्या वनविभागातील पाणवठ्याचे इतरांनी अनुकरण करावे.. संजय शिंदे अहिल्यानगर तहसीलदार



अहिल्यानगर प्रतिनिधी -

दिनांक -१८-उन्हाची अती तीव्रता लक्षात घेता वनविभागातील वन्यप्राणी व पक्षी यांची तहान भागवण्यासाठी लोकसहभागातून कामरगाव येथे जागोजागी तयार केलेले पाणवठे हा उपक्रम स्तुत्य व इतरांसाठी प्रेरणादायी आहे त्याचे अनुकरण तालुक्यातील समाजसेवाभावी संस्था व दानशूर लोकांनी करावे असे आवाहन तहसीलदार संजय शिंदे यांनी केले

   नगर तातुक्यातील कामरगाव येथे वनविभागाचे सुमारे तीनशे हेक्टर क्षेत्र आहे तेथे हरीण ,मोर,ससे,रानडुक्कर तरस इत्यादी वन्य प्राणी आढळून येतात तेथे पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या भावनेतून कामरगाव चे मा.सरपंच तुकाराम कातोरे व वन्य प्राणी सेवा समिती चे कार्याध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी लोकसहभागातून डोंगर रांगेच्या पायथ्याची अनेक पाणवठे तयार केलेले आहेत तेथे पाणी सोडण्याचे काम अविरत चालू असते त्यामुळे वन्य प्राण्याची तहान भागवली जाते.

 शासनाची कुठलीही मदत न घेता लोकसहभागातून पानवठे तयार करून त्यात पाणी सोडले जाते या लक्षवेधी उपक्रमाची पाहणी करण्यासाठी आज नगर तालुक्याचे तहसीलदार संजय शिंदे यांनी भर उन्हात दुपारी एक वाजता काहळ्याच्या डोंगराच्या पायथ्याशी तयार केलेल्या पाणवठ्याची पाहणी केली व त्यांच्या हस्ते पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी सोडले. त्यावेळी शिंदे यांनी समाधान व्यक्त करून नगर तालुक्यात पानवठे निर्मिती करण्याची चळवळ उभी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी वन्यप्राणी सेवा समितीचे अध्यक्ष तुकाराम कातोरे कार्याध्यक्ष राजेंद्र शिंदे रविराज साठे प्रदीप साठे अंबादास रोहकले सुखदेव वेताळ ग्राम महसूल अधिकारी संतोष मांडगे अनिल ठोकळ सखाराम येणारे बबनराव बुरकुले महसूल सहाय्यक अशोकराव तांदळे, महसूल लिपिक सुहास लांडगे प्रवीण देवकर श्रीराम कातोरे यांच्यासह बहुसंख्य वन्यप्रेमी उपस्थित होते.........

 *नाविन्यपूर्ण पाणवठे* ..

    वन विभागात पाणवठे तयार करताना जे सी.बी. च्या साह्याने २५फूट लांब २४फूट रुंद व ४फूट खोल मापाचा खट्टा खोदला जातो त्यावर शेत तळ्याचा जाड कागद अंथरून त्यावर दगडाची पिचिंग केली जाते त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही कागद चोरीला जात नाही व पाणी पिताना चुकून एखादा प्राणी पक्षी त्यात पडला तर त्याला सहज बाहेर पडता येते......................

 *महसूल विभागाने मदतीसाठी केला पुढे हात..* 

  कामरगाव येथील पानवट्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम पाहून तहसीलदार शिंदे नायब तहसीलदार अभिजीत वांढेकर वरिष्ठ लिपिक सुहास उर्फ आबासाहेब लांडगे यांनी पाण्याच्या टँकर साठी महिनाभर लागेल एवढ्या पाण्याचा खर्च स्वखर्चातून करण्याची तयारी दर्शवली त्यामुळे वन्य प्राणी समिती ला मोठा हातभार लागला आहे ......

   *पानवट्यासाठी असा मिळवला जातो लोकसहभाग* 

   गावात होणारे वाढदिवस लग्न समारंभ लग्न वाढदिवस वर्ष श्राद्ध बारसे या कार्यक्रमात लोक आनठाई खर्च वाचवून पैसे देतात त्यातून हे काम चालते......

कामरगाव येथे पानवट्याचे काम पाहून आनंद वाटला हे काम लोकसहभागातून होत असल्याने हे स्वतःचे काम आहे असे समजून लोक भरभरून मदत करतात सरकारच्या मदतीची वाट न पाहता सामाजिक उपक्रमासाठी लोकांनी पुढे येण्याची गरज आहे ...संजय शिंदे तहसीलदार नगरतहसीलदार 


Post a Comment

0 Comments