शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी डिझेल देण्यास नकार? “५ लिटरची ऑईल कॅन घ्या, मगच डिझेल मिळेल” शेतकऱ्यांचा आरोप; प्रशासन कारवाई करणार का?
दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे
महागांव तालुक्यातील धनोडा येथील पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. “प्रथम २१०० रुपयांची ५ लिटरची ऑईल कॅन खरेदी करा, त्यानंतरच डिझेल मिळेल,” असे कथित फरमान पेट्रोल पंप चालकांकडून दिले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या शेती हंगामाच्या पार्श्वभूमीवर ट्रॅक्टर व कृषी उपकरणांसाठी डिझेलची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असताना पेट्रोल पंपावरील या प्रकारामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. अनेक शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसाठी कॅनमध्ये डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपावर जात असताना त्यांना विविध कारणे देत परत पाठविले जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
दरम्यान, प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या सूचनांनुसार पेट्रोल पंप चालकांनी वाहनाचे आर.सी. बुक व आधार क्रमांकाची पडताळणी करून कॅनमध्ये जास्तीत जास्त २० लिटरपर्यंत पेट्रोल अथवा डिझेल देणे अपेक्षित आहे. तसेच शासकीय वाहने व अत्यावश्यक सेवांसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना राखीव कोट्यातून इंधन पुरविण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. प्रत्येक पेट्रोल पंप चालकाने नियमानुसार काही प्रमाणात इंधन राखीव ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अशा परिस्थितीत धनोडा येथील पेट्रोल पंपावर होत असलेल्या कथित मनमानीबाबत प्रशासन कोणती भूमिका घेणार, संबंधित विभाग चौकशी करून दोषींवर दंडात्मक कारवाई करणार का, याकडे महागाव तालुक्यातील जनतेच�

Post a Comment
0 Comments