Type Here to Get Search Results !

येवल्यातील एस एस मोबाईल फोडणारा अट्टल गुन्हेगार अकबर चोरवा जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची सिनेस्टाईल कारवाई; अनेक घरफोड्यांचा उलगडा होण्याची शक्यता

 




प्रतिनिधी गणेश ठाकरे लासलगाव 

नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांत धुमाकूळ घालणारा सराईत गुन्हेगार अकबर खान हबीब खान उर्फ अकबर चोरवा याला स्थानिक गुन्हे शाखा, मालेगावच्या पथकाने सिनेस्टाईल पद्धतीने अटक केली आहे. येवला येथील प्रसिद्ध एस एस मोबाईल दुकान फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी तो पोलिसांच्या रडारवर होता.

ऑक्टोबर २०२४ मध्ये येवला शहरातील एस एस मोबाईल या दुकानात घरफोडी झाली होती. या घटनेत मोठ्या प्रमाणात मोबाईल व इतर साहित्य चोरीस गेले होते. घटनेनंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असता, या गुन्ह्यामागे अकबर चोरवा असल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हापासून स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेचे पथक त्याच्या मागावर होते.

   दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अकबर चोरवा हा मालेगाव बसस्थानक परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला. संशयित तेथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. या कारवाईदरम्यान काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ही धडाकेबाज कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी दत्तात्रय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, दत्ता कांबीरे, पोलीस हवालदार सुभाष चोपडा, दत्ता माळी, आबा पिसाळ, कैलास मानकर, बालाजी कुंटेवाड तसेच तांत्रिक विश्लेषक हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे आदींच्या पथकाने पार पाडली.

अकबर चोरवाच्या अटकेनंतर नाशिक जिल्ह्यासह इतर भागांतील अनेक घरफोड्या व चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलीस त्याच्याकडे सखोल चौकशी करत आहेत.A

Post a Comment

0 Comments