अतनूर जळकोट/ प्रतिनिधी
आज दि.१६ मे वार शनिवार रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र अतनूर येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला. आज रोजी डेंग्यू या आजाराबद्दल माहिती देण्यात आली. प्रभातफेरी घेऊन नागरिकांना जनजागृती करण्यात आली. गावातील सर्व घरांची डास आळी प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आले. नागरिकांना आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कीटकनाशक विशेषत: डासांमार्फत प्रसारित होणाऱ्या हत्तीरोग, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया अशा रोगांच्या नियंत्रणासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अतनूर अंतर्गत ३२ गाव, वाडी, तांडा वस्तीतील तसेच ५ उपकेंद्राच्या आराेग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मलेरियाविषयी जनजागृती करण्यात आली. या मोहिमेत आरोग्यविषयक हस्तपत्रिकेचे वाटप करण्यात आले. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे, पाणीसाठे घट्ट झाकून ठेवावे आदी माहिती गावकऱ्यांना देण्यात आली. गावात मलेरिया व डेंग्यू या आजाराबाबत जनजागरण मोहीम, डेंग्यू जनजागरण मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये गृहभेटी देऊन, कंटेनर सर्वेक्षण करून, घरातील सांडपाण्याची भांडी, पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्थापनाची माहिती दिली. पाणी साठवून टाकी, हौदांची पाहण्यात करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सकलेन शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ.भक्ती कोळ्ळे, आरोग्य सहाय्यक कर्मचारी सलमान शेख, आरोग्य सहाय्यक बालाजी सोनटक्के, गजानन धोंडोरे, दिपा मांगीलवार, लक्ष्मी मेटे, आरोग्य सहाय्यक चंदा सुळकेकर, महेश बिरादार, आरोग्य सहाय्यक महिला स्मिता म्हात्रे, आशा गटप्रवर्तक ज्योती गायकवाड, आशा कार्यकर्ती विजया बोडेवार, सावित्रा कोकणे, सुरेखा गायकवाड आरोग्य मित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन संस्थांचे संस्थापक राज्याध्यक्ष बी.जी.शिंदे अतनूरकर, जिजामाता महिला मंडळ अतनूरच्या अध्यक्षा सौ.संध्या बाळासाहेब शिंदे अतनूरकर, वसुंधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.रुक्मीणबाई पांडुरंग सोमवंशी, ग्राहक संरक्षण परिषदेचे शासन नियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य व ग्राहक समिती महाराष्ट्र राज्यांचे प्रदेश संघटक बी.जी.शिंदे, रूग्ण वाहन चालक इस्माईल ताजोद्दीन मुजेवार, परिचारक सुनिल पिंगनवार, परिचारक पृथ्वीराज चव्हाण, आरोग्य कर्मचारी, आणि रुग्णालयातील नातेवाईक व अतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २८ गाव, ५ उपकेंद्रातील आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य कर्मचारी प्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.
डासांचे उत्पत्तीस्थान नष्ट करा ; आरोग्य स्वयंसेवक आरोग्य मित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी सांगितले की, पावसाळ्यात डेंग्यूचा आजार पसरण्याची भीती असते़ डेंग्यू, मलेरिया या आजारांसाठी डासांच्या जीवन चक्रामध्ये चार अवस्था असून, यापैकी तीन अवस्था पाण्यातील आहे. या तिन्ही अवस्था सहज नष्ट करता येतात़ त्यामुळे डासांची उत्पत्ती रोखता येऊ शकते, असे मार्गदर्शन उपस्थितांनी केले.
तीव्र स्वरूपाचा ताप, अंगदुखी, डाेळ्यांच्या खाेबणीमध्ये अंगावर पुरळ येणे, नाक, कान, हिरड्यांतून रक्तस्राव हाेणे आदी लक्षणे असल्यास डेंग्यू असू शकताे़ त्यामुळे त्वरित डाॅक्टरांशी संपर्क करावा. असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. सकलेन शेख आणि वैद्यकीय अधिकारी डॉ.भक्ती कोळ्ळे यांनी केले.
3 Attachments
• Scanned by Gmail

Post a Comment
0 Comments