Type Here to Get Search Results !

जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या आवडीचा कोणताही मार्ग निवडा परंतु त्या मार्गावर यश प्राप्त होईपर्यंत प्रामाणिक प्रयत्न करत रहा.. बापूसाहेब गायकवाड आय.पी.एस



 अहिल्यानगर प्रतिनिधि बोरुडे संतोष-

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री नृसिंह विद्यालय चास या ठिकाणी इयत्ता १०वी नंतर कोणकोणत्या संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत या विषयावर बोलताना बापूसाहेब गायकवाड (आय.पी.एस.२०२६)यांनी विद्यार्थ्यांना अनेक उपलब्ध असलेल्या संधी बाबत मार्गदर्शन केले ग्रामपंचायत कार्यालयापासून तर आय.ए.एस परीक्षेपर्यंत सर्व माहिती व त्यासाठी लागणाऱ्या पात्रते संबंधी विद्यार्थ्यांना कल्पना दिली. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत रहा मग आपण कोणताही मार्ग निवडला तर त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न सोडायचे नाही असे मत बापूसाहेब गायकवाड यांनी व्यक्त केले..

त्याचबरोबर याप्रसंगी जलसंपदा विभागातील अधिकारी (गट अ)श्री.प्रशांत कसबे यांनी विद्यार्थ्यांना कला व क्रीडा क्षेत्रातील संधींबाबत सांगितले तर या क्षेत्रात देखील आपण आपले करिअर करू शकतो नवनवीन संधी आपल्यासाठी उपलब्ध होऊ पाहत आहेत याबाबत माहिती दिली.. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले श्री राधाकृष्णजी वाळुंज यांनी विद्यार्थ्यांना आपण आपल्यातील सुप्त गुणांना ओळखून त्यांना अधिक वाव कसा देता येईल व पालकांनी देखील आपल्या पाल्याच्या पाठीमागे उभे राहणे कसे गरजेचे आहे हे उदाहरणातून समजावून सांगितले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..त्याचबरोबर या कार्यक्रमांमध्ये इयत्ता १० वी व इयत्ता ९वी मधील अनुक्रमे प्रथम पाच आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.

 याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ सुंबे, दीपक कार्ले, पांडुरंग देवकर, अजय काळे,दीपक भांबरकर,सुरेश काळे, दिपक पाचारणे, प्रदीप घुंगार्डे,विशाल जाधव,गणपत काळे,बाबासाहेब घुंगार्डे, आशिष आचारी, पुष्पवर्षा भिंगारे, कल्पना ठुबे, अशंका मुळे, प्रिया जाधव, महेश मुळे,अनिल पंडित , हेंमत साठे हे उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments