Type Here to Get Search Results !

अतनुरात महाराष्ट्र दिन, मराठी राजभाषा दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन, बौद्ध पौर्णिमा उत्साहात साजरा

 



अतनूर/ जळकोट/ प्रतिनिधी 

जळकोट तालुक्यातील अतनूर येथे महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र व विविध शाळा, महाविद्यालयातील प्रांगणात विशेष म्हणजे, श्रमाचा गौरव करीत शाळेतील महिला कामगार व असंघटित बांधकाम कामगार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात सरपंच चंद्रशेखर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा गांधी राष्ट्रीय विचारवंतांच्या यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली.

१ मे हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना (1960) झाली. मराठी अस्मिता, संस्कृती आणि स्वाभिमानाचा अभिमानाचा दिवस. मराठी ही केवळ भाषा नाही, तर आपली ओळख, संस्कृती आणि विचारांची परंपरा आहे. तिचे जतन व संवर्धन हीच आपली जबाबदारी आहे. असे विचार सरपंच चंद्रशेखर पाटील यांनी व्यक्त केले. तर अखिल भारतीय महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसचे राज्याचे राज्यसमन्वयक एस.जी.शिंदे-पाटील अतनूरकर, राष्ट्रीय मजदूर संघाचे मराठवाडा अध्यक्ष तथा दलित कामगार नेते तथा दलित मित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, आजचा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून ही साजरा केला जातो. हा दिवस जगभरात कामगार वर्गाच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी (जसे की सुरक्षित कामाची जागा, योग्य वेतन) साजरा केला जातो. तसेच आजच बौद्ध पौर्णिमा, तथागत गौतम बुद्ध यांच्या जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाणाचा स्मरणदिन. जगाला करुणा, प्रज्ञा आणि समतेचा मार्ग दाखवणारे, अहिंसा, मध्यम मार्ग आणि मानवी मूल्यांचे अधिष्ठान निर्माण करणारे तथागत गौतम बुद्ध यांना बौद्ध पौर्णिमेनिमित्त कोटी कोटी वंदन! “अप्प दीपो भव” स्वतःचा दीप स्वतः बना, हा संदेश आजही अंधःकारात मार्ग दाखवतो. असे विचार व्यक्त केले.

यावेळी सरपंच चंद्रशेखर पाटील, ग्रामसेवक फिरोज शेख, माजी सैनिक इस्माईल मुंजेवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबुराव पंचगल्ले, वैद्यकीय अधिकारी डॉ.सकलेन शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ.भक्ती कोळ्ळे, आरोग्य मित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन संस्थांचे संस्थापक राज्याध्यक्ष बी.जी.शिंदे अतनूरकर, जिजामाता महिला मंडळ अतनूरच्या अध्यक्षा सौ.संध्या बाळासाहेब शिंदे अतनूरकर, वसुंधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.रुक्मीणबाई पांडुरंग सोमवंशी, ग्राहक संरक्षण परिषदेचे शासननियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य व ग्राहक समिती महाराष्ट्र राज्यांचे प्रदेश संघटक बी.जी.शिंदे, आरोग्य सहाय्यक कर्मचारी सलमान शेख आरोग्य सहाय्यक बालाजी सोनटक्के, औषध निर्माता गजानन धोंडोरे, जनरल नर्सिंग मिडवाइफरी दिपा मांगीलवार, जनरल नर्सिंग लक्ष्मी मेटे, जनरल नर्सिंग आरोग्य सहाय्यक चंदा सुळकेकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ महेश बिरादार, आरोग्य सहाय्यक महिला स्मिता म्हात्रे, रूग्ण वाहन चालक इस्माईल ताजोद्दीन मुजेवार, परिचारक सुनिल पिंगनवार, परिचारक पृथ्वीराज चव्हाण, आशा कार्यकर्ती विजया बोडेवार, सुरेखा गायकवाड, बाळू कोटगिरे, प्रकाश पाटील ढोसणीकर, कर्मचारी खंडू गायकवाड, गुंडू बोडेवार उपस्थित होते.

 



Tags

Post a Comment

0 Comments