दोन दिवसांपासून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण संबंधित विभाग लक्ष देईल का ?
दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे
महागांव:शहरातील जुन्यागाव परिसरात गेल्या दोन दिवसांपासून एका पिसळलेल्या माकडाने अक्षरशः हैदोस माजवला आहे. या माकडाच्या हिंसक आणि विचित्र वागण्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मांजरींना उचलून पळवल्याने खळबळ
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पिसळलेले माकड थेट रहिवासी भागात आणि घरांच्या परिसरात घुसून पाळीव तसेच भटक्या मांजरींना अचानक उचलून पळवून नेत आहे. माकडाच्या या अजब आणि हिंसक उपद्रवामुळे जुन्यागावातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
बालके, महिला आणि वृद्धांमध्ये दहशत
माकडाच्या या हैदोसामुळे विशेषतः
लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नसून त्यांच्यात तीव्र दहशतीचे वातावरण आहे. लहानमहिला आणि ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नसून त्यांच्यात तीव्र दहशतीचे वातावरण आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
प्रशासकीय अनास्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
"गेल्या दोन दिवसांपासून माकडाने परिसरात धुमाकूळ घातला आहे. याबाबत प्रशासनाला कल्पना देऊनही अद्याप कोणतीही पावले उचलली गेलेली नाहीत." - स्थानिक नागरिक
या घटनेला दोन दिवस उलटून गेले तरी संबंधित विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे स्थानिक नागरिकांमधून तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे.
नागरिकांची मागणी
परिसरातील परिस्थिती पाहता वनविभाग किंवा संबंधित स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची तातडीनेदखल घेणे गरजेचे आहे. प्रशासनाने तात्काळ तज्ज्ञ पथक पाठवून या पिसळलेल्या माकडाला जेरबंद करावे आणि जुन्यागावातील नागरिकांना या दहशतीतून लवकरात लवकर दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी आता जोर धरत आहे.

Post a Comment
0 Comments