दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे
वाकान:महागांव तालुक्यातील मौजा वाकान येथे ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासून येथील राजकीय क्षेत्रात अनेक सरपंच, उपसरपंच ग्रा.प सदस्य निवडून आले.मात्र ग्राम विकासाचा पाया घटतच गेलेला आहे.गावातील मतदार नागरिकांनी आपले अमुल्य मतदान करुन आपल्या गावगाडयाचा विकास तेजीने व्हावा व अनेक गरजु लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा म्हणून शर्यतीचे प्रयत्न करुन काही पुढाऱ्यांना एकहाती सत्ता दिली.मात्र सतेच्या सिंहासनावर पोहचताच निवडुन आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना निवळ सतरंज्या उचलायचे काम पडले.काही लोकप्रतिनिधीच्या हम करेसो कायदा या वागणुकीमुळे गावच्या योजना जनतेपर्यंत पोहचल्याच नाहीत व ,,खाया पीया कुच नही ग्लास तोडा बाराना,,हि स्थिती निर्माण झाल्याने, येथील मतदारामधून जुन्या पुढाऱ्यांची आठवण येत गेली,गावातील चौकात व गलीच्या लुकडमध्ये जुन ते सोन म्हणून जुन्या पुढाऱ्यांच्या चर्चा रंगु लागल्या आहेत.जुने ग्रामपंचायत प्रतीनीधी यांचा गावांमध्ये मान सन्मान असायचा,गावचे कोणतेही छोटे मोठे प्रक्ररण आसोत गावातच पंचायत बोलावुन ते प्रकरण मार्गी लावण्याचे कार्य जुन्या पुढाऱ्यांनी केलेत.व त्यांच्या कार्यकाळात झालेली विकासकामे जनतेच्या मनमंदीरात भरुनच आहेत गावांमध्ये त्यांचा एक प्रकारचा दबदबा असायचा आज कुठे हरवलीत ती लोकाभिमुख माणसे असा प्रश्न देखील उद्भवत असल्याने सध्या स्थितींत गावातील नागरिकांमधुन या वेळेस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जुन्या लोक प्रतिनिधीनांच संधी मिळन्याचे दाट संकेत असल्याचे बोलल्या जात आहे.त्यामुळे येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गुढग्याला बाशिंग बांधून बसलेल्या चेलाचपाटयांचा पत्ता कट होन्याचे दाट संकेत समोर येत आहे

Post a Comment
0 Comments