दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे
महागांव:तालुक्यातील वाकान ग्रामपंचायत सदस्य आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमासाठी आज दिनांक १२/०६/२०२६ रोजी अधिकृत अधिकारी /ग्राम महसुल अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विषेश ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.या विशेष ग्रामसभेमध्ये अनुसूचित जाती (ए सी) अनूसुचित जमाती (एस टी) नागरिकाचा मागासवर्ग (ओ बी सी) तसेच प्रवर्ग निहाय महिलांसाठीच्या जागेचे सदस्य पदाचे आरक्षण सर्वानुमते सोडत पद्धतीने काढण्यात आले.वाकान ग्रा पंचायत प्रभाग क्रमांक १ मध्ये ए सी महिला व सर्वसाधारण पुरुषाचे आरक्षण जाहीर करण्यात आले तर प्रभाग क्रमांक २ मध्ये १)ना मा प्र महिला, २) सर्वसाधारण पुरुष,३) सर्वसाधारण महिला,त्याच बरोबर प्रभाग क्रमांक ३) मध्ये १) सर्वसाधारण महिला,२) सर्वसाधारण पुरुष अशा प्रकारे ग्रामपंचायत सदस्य आरक्षण सोडतीचे कार्यक्रम पार पडले यावेळी ग्रा.पंचायत निवडणूक अधिकारी,ग्राम महसुल अधिकारी,ग्रा पं कर्मचारी यांच्या सह गावातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments