Type Here to Get Search Results !

महागांवात भंगार दुकानाला भीषण आग



 लाखोंच्या नुकसानीची शक्यता पाटे लेआऊट परिसरातील घटना; उमरखेडहून अग्निशमन दलाला पाचारण

दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे 

महागांव शहरातील पाटे लेआऊट परिसरात इंडियन पेट्रोल पंपाजवळ असलेल्या सलीमभाई यांच्या भंगार दुकानाला बुधवारी रात्री भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली. रात्री सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

आगीची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने हालचाली करत उमरखेड येथून अग्निशमन दलाला पाचारण केले. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. अग्निशमन दल, महसूल प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.

घटनास्थळाच्या परिसरात दाट वस्ती असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने संपूर्ण शहरात चिंतेचे वातावरण पसरले. अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, महागाव नगरपंचायतीची अग्निशमन गाडी गेल्या दोन वर्षांपासून शोभेची वस्तू अवस्थेत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक पातळीवर तत्काळ मदत उपलब्ध होऊ शकली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांपासून शहरातील वीजपुरवठा खंडित केला जात असून आग लागली त्यावेळीही वीजपुरवठा बंद असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. तथापि, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.घटनास्थळी तहसीलदार अभय मस्के, पोलीस निरीक्षक सुनील आंबुरे यांच्यासह महसूल, पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते.

या आगीत नेमके किती नुकसान झाले प्लास्टिकचे पाईप प्लास्टिकचे बॉटल साहित्य जास्त असल्यामुळे अग्नीने रुद्र रूप धारण केले आहे. महागावनगरपंचायतीच्या अग्निशमन यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

या घटनेनंतर महागाव नगरपंचायतीची अग्निशमन गाडी दीर्घकाळापासून बंद अवस्थेत असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात आग लागल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी सक्षम यंत्रणा उपलब्ध असणे आवश्यक असताना बाहेरील शहरातून अग्निशमन दल बोलवावे लागल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments