Type Here to Get Search Results !

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या थेट मागण्या साठी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार : आमदार बच्चू कडू यांचे आश्वासन



 प्रतिनिधी  गणेश ठाकरे (लासलगाव)

   ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना थेट वेतन का दिले जात नाही, त्यांना टप्प्या-टप्प्याचे मार्ग का आहेत, असा सवाल करत या प्रश्नात सुधारणा करण्यासाठी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मुद्दा मांडून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन प्रहार संघटनेचे राज्याध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिले. "हे अधिवेशन तुमचे, तर पावसाळी अधिवेशन आमचे," अशा शब्दांत त्यांनी कर्मचाऱ्यांना विश्वास दिला.

लाडगाव संभाजीनगर येथे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न  

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे राज्यस्तरीय अधिवेशन दि. 20 जून रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडगाव येथे उत्साहात पार पडले. या अधिवेशनाला राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून हजारो ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, येत्या काही दिवसांत विधान भवनात बैठक लावून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. थेट वेतनश्रेणी,  सेवाशर्ती आणि इतर मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

35 वर्षांच्या कार्याचा आढावा  

युनियनचे संस्थापक राज्य सरचिटणीस गिरीश दाभाडकर यांनी आपल्या भाषणातून 35 वर्षांच्या युनियनच्या कार्यक्रमाचा लेखाजोखा मांडला. युनियनने केलेली विविध आंदोलने, शासन दरबारी केलेला पाठपुरावा याचा सविस्तर उलगडा त्यांनी केला. युनियनचे कार्याध्यक्ष अलाउद्दीन काजी आणि राज्य उपाध्यक्ष दिलीप डिके यांनीही अधिवेशनाबाबत आपले मनोगत व्यक्त केले.

मान्यवरांची उपस्थिती  

या अधिवेशनाला प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे, कार्याध्यक्ष बंडू जवणजाळ, राज्य उपाध्यक्ष दत्ता भोईर, कोषाध्यक्ष विकास भोईर, सचिव अशोक कुथे, सहसचिव नागसेन खंदारे, विभागीय अध्यक्ष संतोष शिंदे, संपर्क प्रमुख दिगंबर सोनटक्के, राज्य सदस्य एकनाथ कीर्तीकर, विभागीय सचिव दर्शन डोंगरे सुभाष घोलप,बापू मोरे महेंद्र मते, बाबा गीते यांच्यासह अनेक राज्य,विभागीय,जिल्हा व तालुका अध्यक्ष व सचिव व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments