Type Here to Get Search Results !

FDA च्या नावाने व्यापाऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न



एकता पत्रकार संघाकडून महागाव तालुक्यातील व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा

दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे 

महागांव:अन्न व औषध प्रशासन (FDA) अधिकारी असल्याचे भासवून महागाव तालुक्यातील व्यापाऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न काही भामट्यांकडून केला जात असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, 'एकता पत्रकार संघा'ने तालुक्यातील सर्व छोटे-मोठे व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

नेमके काय घडत आहे?

काही संशयित व्यक्ती स्वतःला FDA चे अधिकारी असल्याचे सांगून दुकानांची आणि परवान्यांची तपासणी करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्यांकडे येतात. त्यानंतर, कायदेशीर कारवाईची भीती दाखवून व्यापाऱ्यांकडून आर्थिक मागणी केली जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या भामट्यांच्या जाळ्यात अडकून अनेक व्यावसायिक आर्थिक फसवणुकीचे बळी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एकता पत्रकार संघाचा इशारा

ही गंभीर बाब लक्षात घेता, एकता पत्रकारसंघाने महागावमधील व्यापाऱ्यांना सावध केले आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने तपासणीसाठी आल्यास सर्वप्रथम त्यांचे अधिकृत ओळखपत्र (Identity Card) मागणी करावी. तसेच, संशय आल्यास त्वरित स्थानिक पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत खातरजमा करावी.

व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना:

ओळखपत्राची खात्री करा: आलेल्या व्यक्तीकडे अधिकृत फोटो ओळखपत्र आणि सरकारी अधिकारपत्र (Authority Letter) आहे का, याची खात्री करा.

घाबरू नका: कोणत्याही प्रकारच्या धमकीला बळी न पडता नियमांची माहिती घ्या.

Post a Comment

0 Comments