Type Here to Get Search Results !

लासलगाव परिसरात मान्सूनची दमदार सुरुवात; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर



प्रतिनिधी : गणेश ठाकरे लासलगाव, 

 दुपारी तीन वाजता आलेल्या पावसाने समाधान केले नाशिक जिल्ह्यातील कांदा व द्राक्ष पिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव परिसरात अखेर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या बळीराजाला रविवारपासून सुरू झालेल्या पावसाच्या सरींनी मोठा दिलासा दिला आहे.

मशागतीला वेग येणार..

पावसाने उशिरा का होईना, पण हजेरी लावल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, मका, कापूस, तसेच कांदा रोपवाटिकांच्या पेरणीसाठी मशागतीला आता वेग येणार आहे. परिसरात सर्व शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. 

  शनिवार-रविवारपासून ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम सरी सुरू झाल्या आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील ७ दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे, तर घाटमाथ्यावर मेघगर्जनेसह सरी पडू शकतात.  

वेळापूर ता. निफाड येथे वादळी वारा व पाऊस आल्याने एकनाथ कुटे यांच्या कांदा चाळीवरील आवरण उडून गेल्याने कांदा ओला झाला. कांदा ओला असल्याने कांदा खराब होऊ शकतो.  तीन आठवड्यानंतर आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.



Post a Comment

0 Comments