Type Here to Get Search Results !

महागांव तालुक्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने Jio नेटवर्क सेवा ठप्प



दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे 

महागांव तालुक्यातील अनेक गावांमध्ये Jio मोबाईल नेटवर्क सेवा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मागील काही दिवसांपासून कॉल लागत नसणे, इंटरनेटचा वेग कमी होणे तसेच अनेक ठिकाणी नेटवर्क पूर्णपणे गायब होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि ऑनलाइन सेवांवर अवलंबून असलेल्या नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. डिजिटल व्यवहार, शासकीय ऑनलाइन सेवा आणि शैक्षणिक कामकाजावरही परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्थानिक नागरिकांनी संबंधित कंपनीकडे तक्रारी करूनही समस्या कायम असल्याचा आरोप केला आहे. Jio कंपनीने तातडीने तांत्रिक अडचणी दूर करून नेटवर्क सेवा सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments