अहिल्यानगर दि.९ प्रतिनिधी (ग्रामीण)
महाराष्ट्राची भूमी दुष्काळमुक्त करण्यासाठी 2016साली पाणी फाउंडेशन ची स्थापना करण्यात आली. पाणी फाउंडेशनच्या उद्देशाला यश येऊन त्याचे लोक चळवळीमध्ये रूपांतर झाले . सोनेवाडी गावातील सुकन्या शेतकरी महिला गटाने अहिल्या नगर तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाचे साडेपाच लाख रुपयांचे पारितोषिक जिंकले. याबद्दल 'पाणी फाउंडेशन' या संस्थेच्या संस्थापिका सन्माननीय किरणराव( प्रसिद्ध चित्रपट निर्माती, दिग्दर्शिका) यांनी
महिलांच्या कार्याचे व यशाचे कौतुक करताना आपल्या मनोगतात वरील विचार नमूद केले. जिद्द, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि ऐक्य याच्या बळावर आपण ग्रामीण भागाला सुजलाम सुफलाम करू शकतो. गांधीजींचा मूलमंत्र खेड्याकडे चला. खेडे समृद्ध करा हा विचार आपण यशस्वी करू शकतो. त्यासाठी ग्रामीण भागातील लोकांनी ऐक्याची भावना ठेवावी. सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत. महिलांनी जे यश मिळवले . त्याचे त्यांनी कौतुक केले. शेती ही विषमुक्त व्हावी. गटशेती करावी. अडथळ्यांवर मात करताना थांबता कामा नये. अशा भावनाही त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच रोपट्याला पाणी घालण्यात आले.पाणी, माती आणि वृक्ष यासाठी काम करणारे फाउंडेशन असल्यामुळे वृक्षाचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक श्री सुरेश सुंबे यांनी केले. गावचे सरपंच श्री विठ्ठलराव दळवी सर अध्यक्षस्थानी होते. सुकन्या शेतकरी महिला गटाच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचे सन्मान करण्यात आले बक्षीस रूपाने मिळालेल्या पैशातून ओढ्याच्या खोलीकरणाच्या कामकाजाचे उद्घाटन किरण राव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सौ. बेबी सचिन दळवी यांनी गटाच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला सुकन्या शेतकरी महिला गट,भैरवनाथ शेतकरी गट , जिजाऊ महिला शेतकरी गट, दादास्वामी शेतकरी गट, मगरदरा महिला शेतकरी गट, खोपेश्वर महिला शेतकरी गट, हिरकणी महिला गट तसेच पाणी फाउंडेशन चे जिल्हा समन्वयक श्री फाटक साहेब, श्री विधाते, माधुरी मॅडम, उमेदचे श्री संदीप साबळे ,शिंदे मॅडम कृषी खात्याचे श्री जावळे श्रीमती गोसावी मॅडम उपस्थित होते .सर्व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे महिला गटांनी
यश मिळवलं त्याबद्दल या अधिकारी वर्गाचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन आणि खुमासदार सूत्रसंचालन करून श्री हरिश्चंद्र दळवी सर यांनी उपस्थितांची मने जिंकली. शेवटी कार्यक्रमाचे आभार श्री विधाते यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री नंदू दळवी, श्री सचिन दळवी, श्री सतीश दळवी, श्री अर्जुन वारे, श्री शिवाजी सूंबे, श्री अशोक सुंबे, श्री रोहिदास सुंबे श्री माणिक दळवी, अर्जुन वारे,श्री रमेश सुंबे , श्री अशोक ठुबे,श्री रामदास काळे, श्री दिलीप पवार ,जय येणारे , श्रीमती अंजनाबाई बोरगे,सुकन्या जिजाऊ, भैरवनाथ शेतकरी गट व ग्रामस्थांनी यांनी विशेष प्रयत्न केले.

Post a Comment
0 Comments