दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे
महागांव : भारतीय जनता पार्टी फुलसावंगी मंडळाच्या वतीने दिनांक १० जून २०२६ रोजी सांयकाळी ६:०० वाजता येथील श्री. संत साधू महाराज मंदिरात भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ (४३९९ दिवस) देशाची सेवा करणारे पंतप्रधान म्हणून विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल त्यांच्या दीर्घायुष्य,उत्तम आरोग्य व निरंतर राष्ट्रसेवेसाठी विशेष पूजा-अर्चना व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले तसेच त्यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
कार्यक्रमात राष्ट्रहित,जनकल्याण व विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प केला. पूजा-अर्चना व महाआरतीनंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष योगेश वाजपेयी, प्रमोद शेळके, डॉ.गजानन वैद्य, प्रवीण जिल्हावार, तानाजी शिंदे, गजानन शिंदे,आशिष शर्मा, गणेश भगत,आनंद वीर,प्रमोद महाजन,नथू पराते,संदीप शेळके,जांबुवता आडे,रमेश पाचखंडे,अरविंद राठोड,सुमित वैद्य,निशांत पराते,राहुल कुकडे,आकाश कवाने,अभय जांबुतकर,अर्जुन बागडे,चेतन जाधव,मोहन गोभेकर हे उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments