दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे
महागांव तालुक्यातील मौजा वाकान येथील एका विवाहितेला हुंड्यासाठी व इतर कारणांवरून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याच्या तक्रारीवरून महागाव पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. मोहिनी रमेश पवार (वय २२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांचे पती विशाल प्रकाश राठोड (वय ३०), सासरे प्रकाश तुळशीराम राठोड (वय ६५), सासू अनिताबाई प्रकाश राठोड (वय ६०), दीर विजय प्रकाश राठोड (वय ३५), भावजय श्वेता विजय राठोड (वय ३२), नणंद सोनू अभिमन्यू पवार (वय ३२) व वर्षा पवार (वय ३२), सर्व रा. कांटा, जि. वाशिम यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, मोहिनी यांचा विवाह १३ मे २०२५ रोजी हिंदू रीतीरिवाजानुसार विशाल राठोड यांच्यासोबत झाला होता. विवाहानंतर सुरुवातीच्या काही महिन्यांत सासरच्या मंडळींकडून चांगली वागणूक मिळाली. मात्र त्यानंतर पती व इतर नातेवाईकांनी एकत्रितपणे शारीरिक व मानसिक छळ सुरू केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तसेच ठेकेदारीच्या कामासाठी पैशांची मागणी करण्यात आली. विवाहितेच्या वडिलांनी एक लाख रुपये दिल्यानंतरही वारंवार पैशांची मागणी, शिवीगाळ व मारहाण करून छळ करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे. सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून महागाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 85, 352, 351(2), 351(3) तसेच संबंधित तरतुदींनुसार सात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी ठाणेदार अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी करीत आहेत. अजून आरोपीला अटक झाली नाही

Post a Comment
0 Comments