दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे
महागांव: उटी येथीलअनिता भारत आडे यांच्या घरातील विद्युत बोर्डामध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आज दिनांक 16-07-2026 अं.वेळ 4:30 वाजता भीषण आग लागून संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कुटुंबाचा संसार अक्षरशः राख झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरातील विद्युत बोर्डामध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने ठिणग्या उडाल्या आणि काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. आग घरातील फर्निचर, कपडे, धान्य, पलंग, घरगुती उपकरणे तसेच अन्य संसारोपयोगी साहित्यापर्यंत पोहोचल्याने घरातील साहित्य जळाल्यामुळे फार मोठे नुकसान झाले.
आग लागल्याचे लक्षात येताच घरात असलेले व्यक्ती बाहेर येऊनआरडाओरडा करत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे आग शेजारच्या घरांमध्ये पसरण्यापूर्वी नियंत्रणात आणण्यात यश आले. या दुर्घटनेत संबंधित कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून नुकसानाचा पंचनामा करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments