Type Here to Get Search Results !

श्री क्षेत्र कामरगाव येथील ग्रामदैवत श्री कामाक्षा माता पायी दिंडी सोहळ्याचे श्री क्षेत्र मांडवगण येथे उत्साहात स्वागत..



दि. १५/०७/२०२६ रोजी श्री क्षेत्र कामरगाव येथील ग्रामदैवत श्री कामाक्षा माता पायी दिंडी सोहळ्याचे श्री क्षेत्र मांडव्यऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री सिद्धेश्वर महाराजांच्या पवित्र भूमीत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.

यावेळी सर्वप्रथम गावातील युवा नेते श्री संग्राम जी देशमुख (संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष,) सिद्धार्थ घोडके (युवा नेते)  सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विजय राऊत सर, एस. एस. महाजन शेतकी प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री विनोद काराळे सर, श्री हरिचंद्र दळवी सर, श्री सुखदेव वेताळ सर, हेमंतजी साठे, इंजी. रोहित लष्करे तसेच सामजिक कार्यकर्ते व मा.सरपंच तुकाराम कातोरे उद्योजक सतीश शेठ कातोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री कामाक्षा मातेच्या पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांनी मनोभावे पालखीचे दर्शन घेतले.

टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात आणि अभंगांच्या सुरेल स्वरांत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. उपस्थित भाविकांनी मोठ्या श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने पालखी सोहळ्याचे स्वागत केले.

यावेळी यश वेताळ जगदीश शेटे, प्रतीक देशमुख, ऋषिकेश रासकर, अजय लांडगे, अक्षय घोडके, हरिभाऊ (आबा )वल्हेकर  तसेच गावातील अनेक मान्यवर व दिंडीत दीडशे वारकरी व  भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments