दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे
महागांव:महाराष्ट्र राज्यभर सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण एस आय आर अभियानाअंतर्गत वाकान येथील समस्त पात्र मतदारांनी दिनांक २९/ जुलै २०२६ पर्यंत आपल्या गावातील बि.एल ओ यांच्याकडे इ एफ फॉर्म भरून घेण्याचे आव्हान विठ्ठल रूक्मिणी बचत गट सचिव सौ. शारदाताई रवि राठोड यांनी केले आहे.मतदार यादी पुनरिक्षण याबाबत शासनाने प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की.मतदार यादी अघावत करण्यासाठी गावातील पात्र असलेल्या मतदाराने या विषेश पुनरिक्षण एस आय आर मोहिमेत सहभागी होणे आवश्यक आहे.अन्यथा आपले नांव मतदार यादीतुन वगळु शकते.त्यामुळे गावातील पात्र असलेल्या नागरिकांनी संबंधित बि एल ओ यांच्याकडे इ एफ फॉर्म भरून सहकार्य करावेत तसेच मतदारांनी विहित वेळेत आवश्यक प्रक्रिया पुर्ण करुन लोकशाही अधिक बळकट व सक्षम करण्यासाठी सज्ज व्हावे असे मत सौ शारदा राठोड यांनी व्यक्त केले आहे बि एल ओ यांच्याकडे इ एफ फॉर्म भरतांना पासपोर्ट आकाराचा फोटो, आधार कार्ड, मतदान कार्ड ओळखपत्रांचे इ एफ आय सी क्रमांक व आपले मोबाईल क्रमांक असने गरजेचे आहे असे स्पष्टपणे कळविन्यात येत आहे.अधिक माहितीसाठी आपल्या शाळेतील बि एल ओ किंवा संबंधित निवडणूक कार्यालयांशी संपर्क साधावा असे आव्हानही सौ शारदाताई रवि राठोड यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments